• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“गडकरी पंतप्रधान असते तर ;” ठाकरे सरकारमधील नेत्याचे मोठं विधान, चर्चांना उधाण..!

Admin by Admin
May 29, 2022
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
“गडकरी पंतप्रधान असते तर ;” ठाकरे सरकारमधील नेत्याचे मोठं विधान, चर्चांना उधाण..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यं आणि चोख कामासाठी ओळखले जातात. आपल्या भाषणांमध्ये राजकारणापेक्षा विकासकामांवर जास्त भाष्य करणारे नितीन गडकरी यांनी अनेकदा पक्षालाही खडे बोल सुनावले आहेत.

कोणत्याही प्रकल्पाची आकडेवारी तोंडपाठ असणारे नितीन गडकरी मोदी सरकारमधील सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. यामुळेच अनेकदा गडकरी पंतप्रधान व्हावेत असं मतही सर्वसामान्यांसह अनेक राजकीय पक्षाचे नेते मांडत असतात. त्यातच आता बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ही चर्चा रंगली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरला रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते, यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी नितीन गडकरींचं तोंडभरुन कौतुक केलं. नितीन गडकरी पंतप्रधान असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यातील फरक सांगताना म्हटलं की, “मोदी पंतप्रधान झाल्याने मंदिर, मस्जिदचा प्रश्न मिटला. पण गडकरी चांगले व्यक्ती असून ते पंतप्रधान झाले असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता”. बच्चू कडू यांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “ज्यावेळी मोदींनी १०० रुपयांत गॅस वाटला त्यावेळी ४०० रुपयांत सिलेंडर मिळत होते. आज त्याची किंमत एक हजारच्या वर गेली आहे,” अशी टीका बच्चू कडूंनी केली.

Previous Post

दोन कोटी नोकऱ्या देणार होता, त्याचं काय झालं..?

Next Post

कोल्हापुरात मध्यरात्री घरावर दगडफेक , रातोरात झालेल्या हल्ल्याने खळबळ…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

कोल्हापुरात मध्यरात्री घरावर दगडफेक , रातोरात झालेल्या हल्ल्याने खळबळ...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group