• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी : मंत्री विश्वजित कदमांचे सासरे अविनाश भोसले यांना CBI कडून अटक…

Admin by Admin
May 26, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी बातमी : मंत्री विश्वजित कदमांचे सासरे अविनाश भोसले यांना CBI कडून अटक…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे : खबऱ्या प्रतिनिधी ; पुण्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. येस बँक-डीएचएफएल प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे. ३० एप्रिल रोजी भोसले यांच्या पुण्यातील एबीआयएल या कार्यालयावर सीबीआयकडून छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले हे काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.

अविनाश भोसले यांना सक्त वसुली संचालनालयाने गेल्या वर्षी दणका दिला होता. त्यांची ४०.३४ कोटी रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत पुण्यातील शिवाजीनगर येथील गणेशखिंडमध्ये असलेल्या त्यांच्या एबीआयएल कंपनीच्या मुख्यालयावर ईडीने ही कारवाई केली होती. त्यानंतर ३० एप्रिल रोजी सीबीआयने त्यांच्याशी संबंधित संपत्तींवर छापेमारी केली होती.

मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास “सीबीआय’कडून सुरु आहे. त्यांनी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे. दरम्यान, याच बॅंक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, “सीबीआय’कडून भोसले यांचा तपास सुरु होता. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिल महिन्यात “सीबीआय’ने छापे टाकून काही मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या मालमत्तांमधून महत्वाची कागदपत्रेही त्यांनी जप्त केली होती.

भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, उद्योजक असून त्यांचा मुंबई व पुण्यात बांधखाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील भोसलेनगर व डेक्कन जिमखाना परिसरात त्यांची प्रशस्त कार्यालये आहेत. तर पाषाणमध्ये येथे भोसले यांचे आलिशान निवासस्थान आहे. भोसले यांना यापूर्वीही विदेशातून कर चुकवून मौल्यवान चीजवस्तू घेऊन येताना सीमाशुल्क विभागाने विमानतळावर ताब्यात घेतले होते. दरम्यान, सीबीआयने गुरुवारी सायंकाळी भोसले यांना त्यांच्या घरातुन अटक केली.

Previous Post

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पूर्वीचं बौद्ध विहार ; डॉ. आगलावेंचा दावा…

Next Post

मिरजेच्या वड्डीत ‘या’ फार्महाऊसवर छापा ; अंमली पदार्थाचा साठा जप्त..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेच्या वड्डीत ‘या’ फार्महाऊसवर छापा ; अंमली पदार्थाचा साठा जप्त..

मिरजेच्या वड्डीत 'या' फार्महाऊसवर छापा ; अंमली पदार्थाचा साठा जप्त..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group