• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Sangli murder : गुंड तुकाराम मोटेचा निर्घृण खून ; चाकूने केले सपासप वार.

Admin by Admin
May 25, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
Sangli murder : गुंड तुकाराम मोटेचा निर्घृण खून ; चाकूने केले सपासप वार.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ; सांगली शहरातील संजयनगर परिसरातील रेकॉर्डवरील गुंडाचा अज्ञात व्यक्तींनी खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

तुकाराम सुभाष मोटे (वय२७) असं मृत झालेल्या गुंडाचं नाव आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा खून झाला आहे. किरकोळ वादातून तुकाराम याचा चाकूने भोसकून खून झाला असल्याची प्राथामिक माहिती आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी दोन संशयिताना ताब्यात घेतले आहे.

मृत तुकाराम मोटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. काही महिन्यापूर्वी परिसरातील पेट्रोलपंपावर उधार पेट्रोल दिले नाही म्हणून त्याने महिला कर्मचार्‍याचा विनयभंग करुन मारहाण केली होती. इतकंच नाही तर, महिला कर्मचाऱ्याच्या हातातील पैसेही त्याने हिसकाण्याचा प्रयत्न केला होता. या संपूर्ण प्रकार समोर येताच पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर तो जामीनावर बाहेर आला होता.

दरम्यान, संजयनगर परिसरातील तरुणांकडे बघण्यावरुन त्याचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यातून हाणामारी झाली. या हाणामारीत तुकारामला चाकूने भोसकण्यात आले. तीन ठिकाणी खोलवर वार झाल्यामुळे तुकाराम मृत झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोघांना ताब्यात घेतले आहे. तुकाराम याचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास संजयनगर पोलीस करत आहेत.

Previous Post

सांगलीत एलसीबीची धडक कारवाई ; सिलिंडरचा साठा जप्त

Next Post

गांधी पोलिसांकडून मटका घेणाऱ्यावर कारवाई…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
गांधी पोलिसांकडून मटका घेणाऱ्यावर कारवाई…

गांधी पोलिसांकडून मटका घेणाऱ्यावर कारवाई...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group