• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत एलसीबीची धडक कारवाई ; सिलिंडरचा साठा जप्त

Admin by Admin
May 25, 2022
in क्राईम
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली: खबऱ्या प्रतिनिधी; येथील कोल्हापूर रस्त्यावर खिलारे मंगल कार्यालयाजवळ एका दुकान गाळ्यात बेकायदा घरगुती सिलिंडराचा साठा करून त्यातील गॅस रिक्षामध्ये भरून देणार्‍या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी दुपारी छापा टाकला.

छाप्यामध्ये मुख्य संशयितांसह सहा रिक्षाचालकांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 19 सिलिंडर, गॅस भरून देण्यासाठी वापरण्यात येणार्‍या चार इलेक्ट्रीक मोटारी, पाच रिक्षा व चार वजन काटे, असा एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक केलेल्यांमध्ये मुख्य संशयित सिद्धिविनायक सदाशिव देशिंगे (वय 32, रा. नदीवेस, पवार गल्ली, मिरज), सूरज बाळू काटकर (वय 22), रिक्षाचालक कौशल संजय जाधव (वय 20), राकेश विनायक कांबळे (वय 21), वजीर नियामत जमादार (वय 20, चौघेे रा. शामरावनगर, सांगली), संजय ऊर्फ सचिन रमेश पवार (वय 38, रा. संजयनगर सांगली), नागेश तुकाराम ऐवळे (वय 32, रा. पत्रकारनगर सांगली), अमित आप्पासाहेब तांदळे (वय 30, रा. गजराज कॉलनी, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार आर्यन देशिंगकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, हवालदार मेघराज रुपनर, अरूण औताडे, हेमंत ओमासे, आर्यन देशिंगकर, संदीप पाटील यांचे पथक मंगळवारी कोल्हापूर रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी खिलारे मंगल कार्यालयाजवळ समर्थ कॉलनीत नरगुंदे यांच्या दुकान गाळ्यात संशयित सिद्धिविनायक देशिंगे हा रिक्षामध्ये बेकायदा गॅस भरून देत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तिथे जाऊन छापा टाकला. छाप्याची चाहूल लागताचा देशिंगेसह रिक्षा चालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्यांना पकडण्यात आले.

Previous Post

मिरज | महापालिकेच्या शाळेचे होणार ‘मॉडेल स्कुल’..!

Next Post

Sangli murder : गुंड तुकाराम मोटेचा निर्घृण खून ; चाकूने केले सपासप वार.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Sangli murder : गुंड तुकाराम मोटेचा निर्घृण खून ; चाकूने केले सपासप वार.

Sangli murder : गुंड तुकाराम मोटेचा निर्घृण खून ; चाकूने केले सपासप वार.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group