• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सत्ताधाऱ्यांना पायउतार करू; संघटना एकवटल्या..

Admin by Admin
May 23, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक
1 min read
0
सत्ताधाऱ्यांना पायउतार करू; संघटना एकवटल्या..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली / खबऱ्या प्रतिनिधी ; सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारातून बँकेला मुक्त करण्यासाठी विविध शिक्षक संघटना एकत्र येऊन स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ अशी महाघाडी स्थापन केल्याची माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व महाघाडीचे निमंत्रक विनायक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिंदे म्हणाले, निवडणुक बँकेच्या भवितव्यासाठी व सभासदांच्या हितासाठी निर्णायक आहे. विद्यमान सत्ताधारी बँकेचा कारभार मनमानी पद्धतीने करत आहेत. मागील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मिळालेल्या मतापेक्षा सर्व विरोधकांना जवळपास १५०० मते अधिक मिळाली होती. स्वाभिमानी तरुण मंडळाचे आठ संचालक निवडणूक आले होते. केवळ विरोधी मतातील विभाजनामुळे सत्ताधारी सत्तेत आले. गेल्या निवडणुकीत सभासदांनी सत्ताधाऱ्यांचा कारभार नाकारला आहे. सत्ताधाऱ्यांच्या निरंकुश कारभारास लगाम घालण्यासाठी सभासद हितासाठी विरोधी मतातील विभाजन टाळत सर्व संघटना एकत्र आल्या आहेत.

जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अमोल शिंदे म्हणाले, बँकेच्या हिताच्या दृष्टीने जो जाहीरनामा आम्ही सर्वानुमते ठरवला आहे, सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार थांबण्याचा निश्चय केला आहे. म्हणूनच या संघटना एकत्र आल्या आहेत.

पोपटराव सूर्यवंशी म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात मताचा जोगवा गोळा करण्याच्या नादात, इथली बँक न भूतो इतकी कर्ज थकीत झाली आहेत. कर्जाचे व्याजदर बारा वर्षात कमी करणे जमले नाही, ते एक अंकी पुढे तरी कशावरून देणार, असे म्हणाले.

शि.द. पाटील शिक्षक संघाचे धर्यशील पाटील म्हणाले, गेल्या बारा वर्षात सत्ताधाऱ्यांनी सभासदांची वाट लावण्याचे काम केलं आहे. सभासद हिताचा वचननामा व स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळातील सर्व संघटनांची एकजूट, सभासदांचे पाठबळ यामुळे शिक्षक बँकेत परिवर्तन अटळ आहे.

या संघटना एकवटल्या

यावेळी स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ माध्यमातून सांगली जिल्हा प्राथ. शिक्षक संघ, शि. द. पाटील (संघ), जुनी पेन्शन हक्क संघटना, पदवीधर शिक्षक संघटना, खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद, आदर्श शिक्षक समिती सोलापूर, दिव्यांग शिक्षक संघटना, बहुजन शिक्षण आघाडी या प्रमुख संघटनांनी एकत्र येत आज सांगली जिल्हा प्राथमिक, शिक्षक सह. बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक लढवणार असून निश्चय केला.

दवाखान्याचा नवा घोटाळा

शिक्षक बँकेतून जेवढे मिळविता येईल तेवढे या नेत्यांनी व संचालकांनी मिळवलेच पण आपले उखळ आणखी पांढरे करण्यासाठी त्यांनी “दवाखाना” ही सुपीक कल्पना बाहेर काढत ३ हजार कोटींचे हॉस्पिटल काढणार म्हणत दवाखान्यासाठी शेअर्स गोळा करत पुन्हा कोट्यवधी गोळा करण्यासाठी धडपड चालू केली असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात ,आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष अंकुश काळे राज्याध्यक्ष, लहू कांबळे , जिल्हाध्यक्ष सोलापूर शिक्षक संघ म.ज. मोरे , राजाभाऊ राऊत आदर्श शिक्षक समिती सोलापूरचे जिल्हाध्यक्ष, पोपट सूर्यवंशी, तानाजी खोत, विनायक शिंदे जिल्हाध्यक्ष सांगली, धैर्यशील पाटील ,अमोल शिंदे तुकाराम सावंत , बाळासाहेब कटारे ,संजय चरेकर, अरुण पाटील , अमोल माने, हंबीरराव पवार आभार अविनाश गुरव यांनी मानले.

Previous Post

सांगलीकराने जोतिबाच्या चरणी अर्पण केली एक टनाची “पंचधातूंची महाघंटा”.

Next Post

कुपवाडच्या जवानाचे पश्चिम बंगाल मध्ये निधन…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडच्या जवानाचे पश्चिम बंगाल मध्ये निधन…

कुपवाडच्या जवानाचे पश्चिम बंगाल मध्ये निधन...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group