• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीकराने जोतिबाच्या चरणी अर्पण केली एक टनाची “पंचधातूंची महाघंटा”.

Admin by Admin
May 23, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
सांगलीकराने जोतिबाच्या चरणी अर्पण केली एक टनाची “पंचधातूंची महाघंटा”.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जोतिबा (रत्नागिरीवाडी): खबऱ्या प्रतिनिधी :शफिया नदाफ;

जोतिबा मंदिराच्या आवारात आता एक टन वजनाची पंचधातूची महाघंटा बसविण्यात येणार आहे.

ही महाघंटा सांगलीतील भाविकाने जोतिबा चरणी अर्पण केली आहे. येत्या शुक्रवारी (दि .२७ ) ही एक टन वजनाची पंचधातूची महाघंटा मंदिर आवारात बसवण्यात येणार आहे.

घंटेची उंची पावणेचार फूट

पलूस-बुरली येथील भाविक सर्जेराव हिंदुराव नलवडे यांनी स्वखर्चाने बनवलेली ही महाघंटा ‘श्री’ च्या चरणी अर्पण करणार आहेत. या घंटेची उंची पावणेचार फूट असून, यासाठी पंचधातू वापरला आहे. या घंटेचा ३६० अंश कोनात लंबक तयार केला आहे.

नलवडे यांनी यापूर्वी २००० साली बसविली होती महाघंटा

नलवडे जोतिबा देवाचे निस्सीम भक्त असून दर रविवारी व पौर्णिमेदिवशी ते डोंगरावर येतात. २००० मध्ये त्यांनी यापूर्वीची महाघंटा बसविली होती. गेल्यावर्षी ही घंटा तडे गेल्याने खराब झाली होती. नलवडे यांना हे समजताच त्यांनी नवीन घंटा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पलूस येथील केदार मेटल फौंड्रीत या महाघंटेचे काम सुरू आहे.

विधीवत कार्यक्रमात महाघंटेची प्रतिष्ठापना

येत्या शुक्रवारी महाप्रसाद आणि विधीवत कार्यक्रमात महाघंटेची प्रतिष्ठापना होणार आहे. जोतिबा मंदिरातील दत्त मंदिराच्या पाठीमागील बाजुस असणाऱ्या घंटाघरामध्ये ही महाघंटा बसवली जाणार आहे.

मंदिराचे दरवाजे उघडताना वाजवली जाते घंटा

श्री जोतिबा मंदिरातील महाघंटा ही दररोज पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडताना वाजवली जाते. मंदिरात महाप्रसाद, किरणोत्सव, पालखी सोहळा वेळी या महाघंटेचा नाद होतो.

Previous Post

उमळवाडमध्ये एलसीबीची धडक कारवाई…

Next Post

सत्ताधाऱ्यांना पायउतार करू; संघटना एकवटल्या..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सत्ताधाऱ्यांना पायउतार करू; संघटना एकवटल्या..

सत्ताधाऱ्यांना पायउतार करू; संघटना एकवटल्या..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group