• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडच्या जवानाचे पश्चिम बंगाल मध्ये निधन…

सेवा बजावत असताना जवान नरळेंनी शनिवारी आपल्या आईशी फोनवरून संवाद साधला होता.

Admin by Admin
May 23, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कुपवाडच्या जवानाचे पश्चिम बंगाल मध्ये निधन…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कुपवाड : कुपवाड (ता. मिरज जि. सांगली) येथील रवींद्र नारायण नरळे (वय 39, रा.अहिल्यानगर, न्यू विजयनगर) या भारतीय सैन्यातील जवानाचे पाणागड राज्य-पश्चिम बंगाल येथे सेवा बजावताना अकस्मात निधन झालं. नरळे आर्मी मेडिकल कोअर (AMC) 189 मिलीटरी हॉस्पिटल पाणागड येथे नाईक या पदावर सेवा बजावत होते.

याबाबत त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेली माहिती अशी, मयत जवान रवींद्र नरळे मुळ गोंधळेवाडी ता. जत, जि. सांगलीचे आहेत. कुपवाड (ता. मिरज) येथील अहिल्यानगर, न्यू विजयनगर कुपवाड भागात कुटुंबीयांसह वास्तव्य करत होते. कारखाना परिसरातील शांतीनिकेतन विद्यालयामध्ये त्यांनी इयत्ता दहावी पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर सन 2005 साली ते भारतीय सैन्यदलात भरती झाले.

श्रीनगर (जम्मू काश्मीर), पुणे (महाराष्ट्र), जालंदर (पंजाब), जोशी मठ (उत्तराखंड), पाणागड (पश्चिम बंगाल) या विविध ठिकाणी त्यांनी भारतीय सैन्यदलात सतरा वर्षे दीर्घकाळ सेवा बजावली. पश्चिम बंगालच्या पाणागड येथे सेवा बजावत असताना त्यांच्या अकस्मात निधनाची घटना घडली. घटनेची माहिती रविवारी जवान नरळे यांच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी नातेवाईकांसह आक्रोशाचा हंबरडा फोडला. कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. त्याचे पार्थिव पाणागडहून पाठविण्यात आलं असून मंगळवारी अंत्यविधीसाठी सांगली येथे दाखल होणार आहे, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

आई मी सुट्टीवर येणार आहे’

सेवा बजावत असताना निधन झालेल्या जवान रवींद्र नरळे यांनी शनिवारी आपल्या आईशी फोनवरून संवाद साधला. पाच ते सहा महिन्यांपासून घरी परतण्याची वाट पाहणाऱ्या आईला त्यांनी फोनवरून दिलासा दिला होता. त्यावेळी ते म्हणाले ‘आई मी लवकरच सुट्टीवर येणार आहे तू काळजी करू नकोस. सांगलीला येण्यासाठी गाडीमध्ये बसताच मी तुला फोन करेन’ जवान नरळे यांचा त्यांच्या आईशी तो शेवटचा फोन होता.

Previous Post

सत्ताधाऱ्यांना पायउतार करू; संघटना एकवटल्या..

Next Post

जयंतरावांच्या भोवती दलबदलू नेत्यांची रेलचेल ; निष्ठावंत दुरावण्याची चिन्हे..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयंतरावांच्या भोवती दलबदलू नेत्यांची रेलचेल ; निष्ठावंत दुरावण्याची चिन्हे..!

जयंतरावांच्या भोवती दलबदलू नेत्यांची रेलचेल ; निष्ठावंत दुरावण्याची चिन्हे..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group