• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘एलसीबी’मध्ये नियुक्‍तीसाठी अधिकार्‍यांचे गुडघ्याला बाशिंग ..! मर्जीतल्या ठिकाणी सेटिंग लागणार कशी..?

Admin by Admin
May 22, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो
1 min read
0
‘एलसीबी’मध्ये नियुक्‍तीसाठी अधिकार्‍यांचे गुडघ्याला बाशिंग ..! मर्जीतल्या ठिकाणी सेटिंग लागणार कशी..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : गोपनीय खबऱ्या ; स्थानिक गुन्हे अन्वेषण म्हणजे जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी असल्याची माहिती सर्वाना आहेच. याच (एलसीबी) विभागाचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड 31 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्या जागी आपलीच वर्णी लागावी, यासाठी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

एलसीबीला हद्दीची मर्यादा नाही. जिल्हाभर ते काम करू शकतात. 80 जणांचा सध्या स्टाफ आहे. त्यामुळे येथे येण्यासाठी अनेक अधिकार्‍यांची आतापासून धडपड सुरू झाली आहे. काहींनी राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर काहीजण यासाठी काही रक्कम गंगाजळीत टाकायची झालीच तरी तयार असल्याची चर्चा जोरात आहे .? 31 मेपर्यंत काही अधिकार्‍यांचा जिल्ह्यातील कार्यकाल पूर्ण होत आहे. नवीन अधिकारी दाखल होतील. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम हे जुन्या अधिकार्‍यांना या विभागात संधी देणार का, नवीन येणार्‍या अधिकार्‍याची नियुक्ती करणार, याकडे सार्‍यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

दरम्यान, काही महिन्यापूर्वी या विभागातील 15 कामचुकार कर्मचार्‍यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असल्याची माहिती खबऱ्याला मिळाली आहे. शनिवारी सांगली शहर, विश्रामबाग पोलिस ठाण्यातील डीबी शाखेतील नऊ कर्मचार्‍यांची एलसीबीत नियुक्ती केली आहे.

Previous Post

फडणवीसांमुळे आज माझ्यासारखा सातवी नापास गडी दिड लाख पगार घेतोय

Next Post

महानगरपालिकेचे मुख्यालय होणार “कलेक्टर ऑफिस ” समोर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महानगरपालिकेचे मुख्यालय होणार “कलेक्टर ऑफिस ” समोर..!

महानगरपालिकेचे मुख्यालय होणार "कलेक्टर ऑफिस " समोर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group