• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महानगरपालिकेचे मुख्यालय होणार “कलेक्टर ऑफिस ” समोर..!

Admin by Admin
May 22, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
महानगरपालिकेचे मुख्यालय होणार “कलेक्टर ऑफिस ” समोर..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ;
महानगरपालिकेच्या नवीन मुख्यालय इमारतीच्या जागेचा प्रश्‍न सुटला आहे. जागा बदलण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय कृषी विभागाकडून शासनाला सादर झाला आहे.

जागा बदलास मान्यतेची कार्यवाही महिन्यात पूर्ण होईल, असे संकेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले.

विजयनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उत्तरेकडील बाजूस महानगरपालिकेची नवीन मुख्यालय इमारत होणार आहे. याठिकाणी महानगरपालिकेची जागा आयताकृती आहे. कृषी विभाग व महापालिकेच्या काही जागेची अदलाबदल केल्यास महानगरपालिकेचे मुख्यालय चौरस जागेत अधिक चांगल्याप्रकारे होणार आहे. त्यामुळे या ठिकाणची जागा बदलण्यास महापालिकेने कृषी विभागाकडे पाठपुरावा केला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनीही पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.

कृषी विभागाच्या या जागेसंदर्भात विचारले असता आयुक्त कापडणीस म्हणाले, महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीसाठी आवश्यक काही जागा बदलण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय कृषी विभागाकडून पुढील कार्यवाहीसाठी सादर झाला आहे. महानगरपालिकेचे शंभर मीटर बाय शंभर मीटर जागेत चौरसाकृती मुख्यालय इमारतीसाठीचा जागेचा प्रश्‍न सुकर बनला आहे. मुख्य रस्त्यावरून प्रवेश; खासगी तीन मालमत्तांचे होणार अधिग्रहण मिरज-सांगली या मुख्य रस्त्यावरून महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीकडे जाण्याचा प्रवेशमार्ग असणाार आहे. या मार्गात तीन खासगी मालमत्ता आहेत. त्यांना मोबदला देऊन संबंधित जागेचे अधिग्रहण केले जाणार आहे, अशी माहितीही आयुक्त कापडणीस यांनी दिली.

कापडणीस म्हणाले, हनुमाननगर येथील महानगरपालिकेच्या जागेत एसएमकेसी क्‍लब उभारण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांसाठी हा क्‍लब उभारण्यात येणार आहे. एसी हॉल, लॉन, रेस्टॉरंट, रूम, व्हीआयपी सूट, योगा हॉल, जिम, टेनिस कोर्ट व अन्य सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. कर्मचार्‍यांच्या मुलांची लग्ने व अन्य कार्यक्रमांसाठी तसेच कर्मचार्‍यांना व्यायामासाठी उपयोग होणार आहे. तीन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात 1 कोटींची तरतूद केलेली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून ‘डीपीसी’तूनही तरतूद होणार आहे. नव्या ठेवींचे प्रमाण 47.1 टक्क्यांनी घटले

महानगरपालिकेच्या शाळा ‘मॉडेल स्कूल’ केल्या जाणार आहेत. पहिल्या मॉडेल स्कूलसाठी मिरज येथील महापालिका शाळा नं. 19 ची निवड केली आहे. महानगरपालिका आणि आभाळमाया यांच्या संयुक्त विद्यमानेे ही शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित केली जाणार आहे. भौतिक व शैक्षणिक सुविधांसाठी दीड कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी 35 लाख रुपये देणार आहेत. आभाळमाया व लोकसहभागातून उर्वरित रक्कम उभारली जाणार आहे.

महानगरपालिकेची बालवाडी ‘स्क्रिन फ्री’ असेल. बालकांना विविध 39 प्रकारच्या खेळण्यांद्वारे आनंददायी शिक्षण दिले जाणार आहे. बालवाडी शिक्षिकांना वेगवेगळ्या विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Previous Post

‘एलसीबी’मध्ये नियुक्‍तीसाठी अधिकार्‍यांचे गुडघ्याला बाशिंग ..! मर्जीतल्या ठिकाणी सेटिंग लागणार कशी..?

Next Post

संभाजी राजेंना शिवसेना प्रवेशासाठी सोमवारपर्यंत मुदत..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
संभाजी राजेंना शिवसेना प्रवेशासाठी सोमवारपर्यंत मुदत..!

संभाजी राजेंना शिवसेना प्रवेशासाठी सोमवारपर्यंत मुदत..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group