पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा सामना करणाऱ्या देशातील नागरिकांना केंद्र सरकारने शनिवारी मोठा दिलासा जाहीर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क (एक्साईज ड्युटी) आठ रुपयांनी आणि डिझेलवर सहा रुपयांनी कमी करत आहोत. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहेत.
यासोबतच, अर्थमंत्र्यांनी असेही सांगितले की, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर (१२ सिलिंडरपर्यंत) २०० रुपये सबसिडी दिली जाईल. यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल, असे ते म्हणाले.

