Sunday, June 8, 2025
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जन्म मृत्यूचे दाखले मिळणार ‘इथे ‘..! आता हेलपाटे वाचणार..

Admin by Admin
May 21, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
जन्म मृत्यूचे दाखले मिळणार ‘इथे ‘..! आता हेलपाटे वाचणार..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ; जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी संबंधित महानगरपालिका, नगरपालिकेेतील हेलपाटे आता थांबणार आहे.

शासनाच्या आदेशानुसार आता जन्म किंवा मृत्यू ज्या शासकीय रुग्णालयात झाला त्याच रुग्णालयात विहीत वेळेनंतर दाखला मिळणार आहे. पहिली प्रत मोफत असणार असून त्यापेक्षा अधिक प्रतीला पाच रुपये आकारले जाणार आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयात याची नोंदणीची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

कोणत्याही रुग्णालयात जन्म अथवा मृत्यूची घटना घडल्यास त्याची महानगरपालिका, नगरपालिका अथवा ग्रामपंचायतीमध्ये नोंद होत असते. संबंधितांना दाखले हवे असल्यास महिनाभरानंतर त्या त्या कार्यालयात हेलपाटेही मारावे लागत असत. शासनाच्या या निर्णयानुसार आता ज्या रुग्णालयात ही घटना घडली त्याच रुग्णालयात २१ दिवसानंतर हे दाखले नागरिकांना मिळणार आहेत.

पाच रुपयांचा दाखला शंभर रुपयांना प्रकार थांबणार

महापालिका अथवा नगरपालिकेत दाखल्यासाठी नियमानुसार असलेली रक्कम तर घेतली जातेच शिवाय त्यापेक्षा अधिक चिरीमिरीसाठी अडवणुकीचेही प्रकार होत असतात. आता जुन्या दाखल्याशिवाय काही काम नसून, सर्व नोंद रुग्णालयातच असणार आहे.

कर्मचाऱ्यांची वाणवा

शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अगोदरच कमी आहे. त्यात या निर्णयाची अंमलबजावणी करताना किमान चार ते सहा कर्मचाऱ्यांची या कक्षाकडे नेमणूक करावी लागणार आहे. मात्र, कर्मचारी संख्या कमी असल्याने रुग्णालय प्रशासनाची अडचणच होणार आहे.

२१ दिवसानंतर दाखले मिळणार

जन्म अथवा मृत्यूची घटना झाल्यानंतर त्वरित दाखले मिळणार नसून, त्याची नोंद व इतर माहिती संकलित करणे आवश्यक आहे. त्यामुळे २१ दिवसानंतर हे दाखले मिळणार आहेत.

लूट थांबणार का?

जन्म, मृत्यू दाखल्यासाठी नेहमीच नागरिकांची लुबाडणूक करण्यात येते. पाच रुपयांच्या दाखल्यासाठी ताटकळत थांबवून पैसेही काढले जातात. आता ही सोय रुग्णालयात होणार असली तरी ही लूट थांबणार का? हा सवाल कायम आहे.

शासन निर्देशानुसार रुग्णालयातच जन्म, मृत्यू नोंदणी करुन दाखल्यांचे वितरण केले जाणार आहे. एक मेपासून याची नोंद सुरू झाली असून, विहीत वेळेनंतर दाखले रुग्णालयातच देण्याची सोय करण्यात आली आहे. – डॉ. नंदकिशोर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय रुग्णालय, सांगली.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

“आता तुम्ही गाठोडे बांधा; सांगली -मिरजेतील पुरपट्ट्यामधील नागरिकांना नोटीसा..”

Next Post

Breaking | पेट्रोल ९.५० तर डीझेल ७ रुपयांनी झाले स्वस्त…सोबत १२ सिलिंडरपर्यंत ‘एवढी’ सबसिडी…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

Breaking | पेट्रोल ९.५० तर डीझेल ७ रुपयांनी झाले स्वस्त…सोबत १२ सिलिंडरपर्यंत ‘एवढी’ सबसिडी…

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

ताज्या बातम्या

ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

by Admin
June 5, 2025
0

अगदी क्षुल्लक कारणांवरून हाणामारी, खुनाच्या घटना राज्यात ठिकठिकाणी रोज घडत असल्याचे समोर येत आहे. यातच सांगली शहरामध्ये एका भाजी विक्रेत्या...

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने लगट वाढवून अनैतिक संबंधाचा आरोप करण्याची भीती घालत महिलेसह पाच जणांच्या...

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या इस्लामपूर बसस्थानक परिसरात पिस्तूल घेऊन फिरणार्‍या जिलानी मकबुल नरगुंद (वय 27, रा. चांद कॉलनी, मिरज)...

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या काँग्रेसच्या बंडखोर नेत्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत मदनभाऊ गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची...

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णाकडून घेतले जात असल्याचा आरोप करत खासगी रुग्णालयाची प्रचंड तोडफोड...

सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

ब्रेकिंग | मिरजेत बारमध्ये जोरदार हाणामारी

by Admin
June 3, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातील विजापूर वेस येथे असणार्‍या एका बारमध्ये जोरदार हाणामारी झाली. बारमध्ये तोडफोडीस विरोध केल्याने दोन...

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | ‘चारचाकीच्या धडकेतील जखमी वृद्धेचा मृत्यू’; सांगली-मिरज रस्त्यावरील घटना

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शहरातील सांगली-मिरज रस्त्यावरील असलेल्या गेस्ट हाऊस परिसरात चालत निघालेल्या वृद्धेला...

राज्यातील ५०० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या,३०० हून अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या

सांगली जिल्ह्यातील ‘पोलिस अंमलदारांच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिद्ध’: १७८ जणांची बदली; नऊ जणांना मुदतवाढ

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या जिल्हा पोलिस दलातील अंमलदारांना जिल्हांतर्गत बदल्यांचे गॅझेट आज रात्री उशिरा...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group