• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बामणोली येथील जवान शहीद; ३ महिन्यांपूर्वीच दाखल झाले होते सैन्यदलात..

Admin by Admin
May 21, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष, सामाजिक
1 min read
0
बामणोली येथील जवान शहीद; ३ महिन्यांपूर्वीच दाखल झाले होते सैन्यदलात..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा; खबऱ्या प्रतिनिधी : जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय 22) यांना कर्तव्यावर असताना झालेल्या चकमकीत रात्री साडेदहाच्या सुमारास वीरमरण आले.

त्यांचे पार्थिव उद्या (रविवारी) बामणोली तर्फ कुडाळ गावी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

प्रथमेश संजय पवार हे तीन महिन्यांपूर्वीच सैन्यदलात भरती झाले होते. सीमा सुरक्षा दलात दाखल होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच पवार यांनी पाहिले होते. ते स्वप्न वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी पूर्ण केले. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी भरती झालेले प्रथमेश पवार यांनी देशासाठी बलिदान दिले.

शहीद प्रथमेश यांचे मावसभाऊ अमोल गंगोत्रे (रा. बामणोली तर्फ कुडाळ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मे रोजीच्या रात्री जवान प्रथमेश पवार हे जम्मू सांबा ब्लॉक परिसरात डयुटीला होते. त्यावेळी अचानक दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना प्रथमेश यांना गोळी लागली. यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याची माहिती त्यांच्या घरी दूरध्वनीवरून सेना दलातील अधिकाऱ्यांनी दिली.

शहीद प्रथमेश पवार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शालेय शिक्षण घेतले होते. प्राथमिक शिक्षण बामणोली तर्फ कुडाळ येथे झाल्यानंतर बारावीपर्यंत पाचवड येथील विद्यालयामध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सैन्यदलात त्यांचे सिलेक्शन झाले. सैन्यदलात दाखल होऊन तीन महिने झाले असतानाच देशसेवा बजावताना प्रथमेश यांना वीरमरण आले. त्यामुळे त्यांच्या गावासह संपूर्ण जावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे.

Previous Post

‘आधी शिवबंधन बांधा, मगच उमेदवारी देण्याबाबत विचार करू’.!

Next Post

अन्यथा…मिरज महापालिकेसमोर ढोल- ताशे वाजवून आंदोलन ;राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने दिला इशारा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अन्यथा…मिरज महापालिकेसमोर ढोल- ताशे वाजवून आंदोलन ;राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने दिला इशारा..!

अन्यथा...मिरज महापालिकेसमोर ढोल- ताशे वाजवून आंदोलन ;राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने दिला इशारा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group