• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अन्यथा…मिरज महापालिकेसमोर ढोल- ताशे वाजवून आंदोलन ;राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने दिला इशारा..!

Admin by Admin
May 21, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
अन्यथा…मिरज महापालिकेसमोर ढोल- ताशे वाजवून आंदोलन ;राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने दिला इशारा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी ;
मिरज शहरांमध्ये नियमित मुबलक वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याने तसेच गुंठेवारी भागांमध्ये मुरूम टाकला नसल्याने , शिवाजी रस्त्याचे काम महापालिकेने पाहण्या संदर्भात ,मिरज शहरातील भटकी जनावरे व कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा म्हणून आज मिरज महापालिकेचे उपायुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस जैलाब शेख यांच्या नेतृत्वाखाली नागरी समस्या बाबतचे निवेदन देण्यात आले.

यावेळी शेख म्हणाले की, मिरज शहरांमध्ये अमृत जलयोजना सुरू होऊन देखील मिरज शहरला अपुरा अवेळी, अल्प प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो.अमृत जल योजनाचा उद्देश होता की मिरज शहराला स्वच्छ व मुबलकपाणी 24 तास पाणीपुरवठा केला जाणार होता. पण तसं काय नाही होता उलट नागरिकांची गैरसोय होऊन अनियमित पाणीपुरवठा होत आहे ,याकडे आयुक्तानी जातीने लक्ष घालावे ,पाण्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

मिरज शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर जास्त झालेला आहे. भटक्या कुत्र्यांची ताबडतोब एबीसी करावं (ॲनिमल बर्थ कंट्रोल) डॉग व्हॅन संपूर्ण शहरा सह गुंठेवारी भागांमध्ये पाठवणे व कुत्र्यांना बंदिस्त करून नसबंदी करणे, तसेच गुंठेवारी भागामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ,पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. औषध फवारणी होत नाही, पावसामुळे गुंठेवारी भागातील रस्ते खराब झालेले आहेत, त्वरीत मुरूम टाकून नागरिकांची गैरसोय दूर करावी.

मिरजेच्या मुख्य शिवाजी रोड हा योग्य पद्धतीचा झालेला नसून या रस्त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. रस्त्याची उंची वाढवल्याने अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी व दुकानांमध्ये पाणी जाणार आहे ,मिरजेच्या बस स्टँड व सिटी बस स्टँड मध्येही पाणी साचणार आहे.

आजूबाजूला पाणी साचून मुख्य रस्तेही खराब होण्याचे चिन्ह आहेत. तसेच महापालिकेच्या अभियंत्याने याची सखोल व सविस्तर अभ्यास करून महाराष्ट्र शासनाला तसा रिपोर्ट सादर करून रस्त्याची उंची न वाढवता रस्ता तीन फुटाने खणून पूर्ण रस्ता करावा.

(रस्त्याची उंची वाढवण्यास मज्जाव करणे)जेणेकरून रस्त्याचे समतोल राखता येईल, मिरज महापालिकेचे ड्रेनेज व पावसाचे पाणी रस्त्यावर साचणार नाही ,याची दक्षता घ्यावी. अन्यथा …मिरज महापालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारापाशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ढोल ताशे आंदोलन करण्यात येईल ,असे निवेदन मिरज महापालिकेचे उपायुक्त यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस जैलाब शेख,खोके मालक संघटनाचे इब्राहिम बागवान,सामाजिक कार्यकर्ते गणेश कांबळे,मिर्झा शेख आदी उपस्थित होते.

Previous Post

बामणोली येथील जवान शहीद; ३ महिन्यांपूर्वीच दाखल झाले होते सैन्यदलात..

Next Post

“आता तुम्ही गाठोडे बांधा; सांगली -मिरजेतील पुरपट्ट्यामधील नागरिकांना नोटीसा..”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“आता तुम्ही गाठोडे बांधा; सांगली -मिरजेतील पुरपट्ट्यामधील नागरिकांना नोटीसा..”

"आता तुम्ही गाठोडे बांधा; सांगली -मिरजेतील पुरपट्ट्यामधील नागरिकांना नोटीसा.."

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group