• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज तालुक्याचं एक पाऊल पुढे ; ११२ कोटी रुपयांच्या विकास कामांचे शुक्रवारी उद्घाटन; आ. सुरेश खाडे यांची माहिती ; दिग्गजांची लाभणार उपस्थिती..

Admin by Admin
May 18, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मिरज तालुक्याचं एक पाऊल पुढे ; ११२ कोटी रुपयांच्या विकास कामांचे शुक्रवारी उद्घाटन; आ. सुरेश खाडे यांची माहिती ; दिग्गजांची लाभणार उपस्थिती..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज /खबऱ्या प्रतिनिधी ;
मिरज विधानसभा क्षेत्रातील ११२ कोटी ७ लाख रूपयांच्या मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच भव्य कार्यकर्ता मेळावा शुक्रवार दि.२० मे २०२२ रोजी दु.१.३० वा. सुभाषनगर, पाण्याच्या टाकीजवळ होणार असून यासाठी विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रेल्वे, खण-कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आ.सुरेशभाऊ खाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

यावेळी भाजपा राज्यचिटणीस मकरंद देशपांडे, मोहन वनखंडे उपस्थित होते. आ. सुरेभाऊ खाडे म्हणाले, भाजप सत्तेवर असताना ही कामे मंजूर करण्यात आली होती. या अंतर्गत मिरज तालुक्यातील कवलापूर पाणी पुरवठा योजना १५ कोटी ९३ लाख, मिरज-कृष्णाघाट राज्यमार्गावरील रेल्वे उड्डाणपुल बांधणे ३५ कोटी१९ लाख, सुभाषनगर येथील पाणी पुरवठा योजना १५ कोटी ७४ लाख, बेडग येथील पाणी पुरवठा योजना १७ कोटी ५३ लाख, मिरज तालुक्यातील ढवळी-म्हैसाळ रस्ता प्रजिमा ४४ किमी ढवळी गावाजवळ लहान पुल बांधणे ४ कोटी ७५ लाख, मालगाव येथील सिध्देश्‍वर मठ परिसर सुशोभिकरण ४ कोटी ५० लाख, टाकळी येथील जल जीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजना ३कोटी ८ लाख रु रक्कम.

तसेच मिरज तालुक्यातील चाबुकस्वारवाडी-सलगरे-डोंगरवाडी-शिपूर-आरग प्रजिमा रस्ते करणे ४ कोटी, बेळंखी खिंड ते आरग-नरवाड, राज्यहद्दीपर्यंतचा रस्ता करणे ४ कोटी, मिरज तालुक्यातील सोनी-पाटगांव रस्ता प्रजिमा ५७ किमी ४/९०० मध्य सोनी गावाजवळ लहान पुल बांधणे २ कोटी ७५, कवलापूर येथील गाव तलाव सुशोभिकरण २ कोटी ५० लाख, बेडग येथील मरगाई मंदिर परिसर सुशोभिकरण २ कोटी १० लाख असे एकूण ११२ कोटी ७ लाखांच्या विकास कामांचे उद्घाटन विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वे, खण-कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते होणार आहे, अशी माहिती आ.सुरेशभाऊ खाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

Previous Post

महाविकास आघाडी अशक्यच; शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वर्चस्वासाठी चुरस

Next Post

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीचे बिगुल वाजले; ३ जुलै ला मतदान…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीचे बिगुल वाजले; ३ जुलै ला मतदान…

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीचे बिगुल वाजले; ३ जुलै ला मतदान...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group