• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महाविकास आघाडी अशक्यच; शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वर्चस्वासाठी चुरस

Admin by Admin
May 18, 2022
in राजकीय
1 min read
0
राजकारण्यांच्या गुन्हेगारीला सामान्यांच्या रक्षणकर्त्यांचे ‘बळ’..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यात कोठेही महाविकास आघाडी होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही.

महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीनही पक्षांच्या तालुक्यातील नेत्यांमध्ये वर्चस्वासाठी कमालीची चुरस असल्याने, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे या स्थानिक स्वराज्य संस्थांवर काही अपवाद वगळता पूर्णपणे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीलाच आघाडी केल्यास जास्त त्याग करावा लागणार असल्याने महाविकास आघाडीची शक्यता धूसर दिसत आहे.

विसर्जित जिल्हा परिषदेत 75 पैकी 44 सदस्य राष्ट्रवादीचे होते. शिवसेनेचे 13 सदस्य होते, तर काँग्रेसचे 7 पैकी 3 सध्या भाजपमध्ये असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर गेले आहेत. जिल्हा परिषदेतील या बळामुळे, तसेच इच्छुकांच्या प्रचंड रेट्यामुळे राष्ट्रवादीला महाविकास आघाडीसाठी घटक पक्षांना जागा सोडणे केवळ अशक्य होणार आहे. पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडी करायचे ठरले तर सर्वात मोठा त्याग राष्ट्रवादीला करावा लागेल. याची तयारी राष्ट्रवादीचे नेतृत्व दाखवेल का, हा कळीचा मुद्दा आहे. जरी राष्ट्रवादीने तयारी दाखवली तरी पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी या तालुक्यांत काँग्रेस आणि शिवसेनाही त्याला तयार होईल का, हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी या तालुक्यांत शिवसेना आपले वर्चस्व राखण्यासाठी निकाल काहीही येवो, सर्व जागा लढविण्याच्या पवित्र्यात असणार आहे. तिच स्थिती काँग्रेसची पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी या तालुक्यांत आहे. काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीला जागा सोडण्यास एकवेळ तयार होतील. परंतु एकमेकांना जागा सोडणार नाहीत. विधानसभेची गणिते या राजकारणात गुंतलेली आहेत.

दौंड, बारामती, इंदापूर या तालुक्यांत तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद प्रचंड आहे. सगळ्या जागा ते निवडून आणू शकतात. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांची ताकद अल्प असल्याने राष्ट्रवादी आपल्यातील वाटा या पक्षांना द्यायला कधीही तयार होणार नाही. दौंड-इंदापूर तालुक्यात भाजपबरोबर लढण्यास राष्ट्रवादीची ताकद सक्षम असल्याने त्यांना यासाठी या तालुक्यांत काँग्रेस, शिवसेनेची जास्त गरज लागेल असे चित्र सध्या तरी नाही.

Previous Post

‘मला सत्तेशी काही देणं-घेणं नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिलीय.’

Next Post

मिरज तालुक्याचं एक पाऊल पुढे ; ११२ कोटी रुपयांच्या विकास कामांचे शुक्रवारी उद्घाटन; आ. सुरेश खाडे यांची माहिती ; दिग्गजांची लाभणार उपस्थिती..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज तालुक्याचं एक पाऊल पुढे ; ११२ कोटी रुपयांच्या विकास कामांचे शुक्रवारी उद्घाटन; आ. सुरेश खाडे यांची माहिती ; दिग्गजांची लाभणार उपस्थिती..

मिरज तालुक्याचं एक पाऊल पुढे ; ११२ कोटी रुपयांच्या विकास कामांचे शुक्रवारी उद्घाटन; आ. सुरेश खाडे यांची माहिती ; दिग्गजांची लाभणार उपस्थिती..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group