• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीचे बिगुल वाजले; ३ जुलै ला मतदान…

Admin by Admin
May 18, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीचे बिगुल वाजले; ३ जुलै ला मतदान…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली /खबऱ्या प्रतिनिधी ; सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीचा (Sangli District Bank) कार्यक्रम जाहीर झाला असून, तीन जुलै मतदान तर पाच जुलै मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक प्राधिकरणने आज हा कार्यक्रम जाहीर केला.

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक कधी जाहीर होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. नऊ मे रोजी बँकेची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आठवड्यातच निवडणुका जाहीर करण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था उर्मिला राजमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिक्षक बँकेसाठी सहा वर्षांनी निवडणूक होणार आहे सध्या बँकेत शिक्षक समितीच्या पुरोगामी शिक्षक मंडळाची सत्ता आहे. त्यांच्या विरोधात शिक्षक संघाचे तीन गट उभे ठाकणार की ते एकत्र येणार याची उत्सुकता आहे. निवडणुका जाहीर झाल्यामुळे उमेदवार निश्चिती, गटांची जोडणी यासाठी हालचाली गतिमान होणार आहेत. तडजोडीसाठी तयार असल्याचे संघटनांचे नेते म्हणत असले तरी स्वतःहून कोणी हात पुढे करायला तयार नाहीत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की लढली जाणार याची उत्सुकता सभासदांमध्ये आहे.

शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी २७ मेपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तीन जुलै रोजी मतदान तर पाच जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. २१ संचालकांमध्ये सर्वसाधारण गटातून १६, अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, आणि भटक्या विमुक्त जाती, जमाती या प्रत्येक गटातून एक तसेच महिलांसाठी दोन जागा राखीव ठेवल्या आहेत.

शिक्षक बँक निवडणूक कार्यक्रम

अर्ज दाखल करणे ता. 27 मे ते दोन जून
अर्ज छाननी ता. 3 जून
अंतिम उमेदवार यादी जाहीर ता. 6 जून
उमेदवारी माघार घेणे सहा जून 20 जून
उमेदवारांना चिन्ह वाटप ता. 21 जून मतदान
ता. ३ जुलै सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत…
मतमोजणी ता. ५ जुलै.

Previous Post

मिरज तालुक्याचं एक पाऊल पुढे ; ११२ कोटी रुपयांच्या विकास कामांचे शुक्रवारी उद्घाटन; आ. सुरेश खाडे यांची माहिती ; दिग्गजांची लाभणार उपस्थिती..

Next Post

12वी पाससाठी हेड कॉन्स्टेबल पदाची बंपर भरती.. पगार 81000 पर्यंत मिळेल, लगेच अर्ज करा..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
12वी पाससाठी हेड कॉन्स्टेबल पदाची बंपर भरती.. पगार 81000 पर्यंत मिळेल, लगेच अर्ज करा..

12वी पाससाठी हेड कॉन्स्टेबल पदाची बंपर भरती.. पगार 81000 पर्यंत मिळेल, लगेच अर्ज करा..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group