नाशिक : ती फॅशनेबल चष्मा, हाय फाय ड्रेस अन् स्मार्ट पोलिस म्हणून मिरवायची. मनसेच्या आंदोलक महिलांना पकडल्यावर तीने पोझ देत फोटो काढले होते. मात्र आज ती वीस हजाराची लाच घेतावा `एसीबी`च्या जाळ्यात अडकली.
नाशिक पोलिसांत सलग दुसऱ्या दिवशी दोन घटना घडल्याने वरिष्ठ अधिकारी संतप्त झाले आहेत.
नाशिक शहर पोलीस दलात लाच घेण्याचे प्रकार वाढले असून दोन दिवसात सलग दोन पोलीस कर्मचारी आणि अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिता पवार या स्मार्ट पोलिस म्हणून मिरवून घेत असत. हायफाय ड्रेस, चष्मा अन् स्टाईलने मिरवणारी ही अधिकारी आज सकाळी तक्रार अर्ज निकाली काढायचा म्हणून वीस हजाराची लाच घेताना जाळ्यात अडकल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
काल आडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल कॉन्स्टेबल राजेश थेटे यांना 20 हजारांची लाच मागताना पकडण्यात आले आहे. हे प्रकरण उघड होताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी तातडीने या गैरप्रकारांलची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची बदली करण्यात आली आहे.
या लाच प्रकरणाला चोवीस तास उलटत नाही तोच भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार या अधिकारी आणि पोलीस नाईक तुषार बैरागी हे दोघेही २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. पोलिसउप अधीक्षक वैशाली पाटील यांनी पोलिस अधीक्सुषक नील कडासने व अपर पोलिस अधीक्जेंषक नारायण न्द्रयाहाळदे यांच्या मार्गदर्सनाखाली ही कारवाई केली. त्यात राजेंद्र गिते, शरद हेंबाडे, अजय गरूड, प्रकाश महाजन यांनी ही कारवाई यशस्वी केली.
एकीकडे गृह विभाग ‘खाकीची प्रतिमा’ सुधारण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे शहर पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी खाकीला काळिमा फासणारी कृत्ये करत असल्याची बाब उघड झाली आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात एकाचवेळी अधिकारी, कर्मचारी लाच घेताना पकडले गेले असल्याने आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची काल बदली करण्यात आली होती.

