• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलिसांना मिळणार मुंबईत ५० लाखात घर; राज्य सरकारची घोषणा…

Admin by Admin
May 18, 2022
in मंत्रालय
1 min read
0
पोलिसांना मिळणार मुंबईत ५० लाखात घर; राज्य सरकारची घोषणा…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, 18 मे : काही दिवसांपूर्वी आमदारांना मोफत घरांची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी केली होती. पण, सर्वच स्तरातून टीका होत असल्यामुळे हे घर मोफत नसणार अशी सारवासारव गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली होती.

आता मुंबईतील वरळी बीडीडी चाळमध्ये पोलिसांना घर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पण, पोलिसांना या घरांसाठी 50 लाख रुपये मोजावे लागणार आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. यावेळी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाली.

या बीडीडी चाळीत सध्या तिथं क्वाटर्समध्ये (worli bdd chawl police quarters) राहत असलेल्या पोलिसांना ५० लाख रूपयांना घरे दिली जातील. २२५० पोलीस कुटुंबीय तिथं राहत असून माणुसकीच्या भावनेतून त्यांचा विचार करण्यात आला आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसंच, या बीडीडी चाळीत पोलिसांना ५०० चौरस फुटांची घरे दिली जातील. ज्याचा वरळीत बांधकाम खर्च १ कोटी ५ लाख इतका आहे.

त्यामुळे फुकटात अजिबात घरे दिली जाणार नाहीत. गिरणी कामगार आणि पोलीस यांची तुलना होऊ शकत नाही, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं. ‘मुळात ती पोलीस क्वाटर्स आहेत. त्यांचा यावर काहीही हक्क नाही.

असं प्रत्येक ठिकाणी झाले तर पोलिसांना मुंबईत राहण्यासाठी क्वार्टर्स मिळणार नाहीत. हा धोरणात्मक निर्णय नाही, वरळीपुरता हा निर्णय आहे. फुकटात घर देणार नाही. त्यांचा मालकी हक्क नाही, सरकारने मोठ्या मनाने घरं देतंय.

५० लाख किंमत द्यावीच लागणार आहे, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी मुंबईतील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता.

यावेळी ‘आपलं रक्षण करणारे पोलीस कर्मचारी हे राज्याचे मुख्य घटक आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा घराचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे. राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांचे क्वार्टर हे चांगले नाही. पोलीस कर्मचारी १६-१६ तास काम करतात पण त्यांना चांगला निवारा नाही. त्यामुळे पोलिसांनी हक्काचे घर मिळाले पाहिजे. सरकारने आपल्या रक्षकांसाठी चांगले घरं निर्माण करण्यासाठी काम हाती घेतले पाहिजे, अशी सूचना शरद पवार यांनी सरकारकडे केली होती.

Previous Post

कुपवाडमध्ये आर्थिक वादातून ऑनलाईन लॉटरी चालकाचा खून ..

Next Post

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक…

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group