• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत घर फोडले; दागिने, रोकड लंपास…

Admin by Admin
May 17, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली मिरजेतील नागरिकांच्यात भितीचे वातावरण, ‘या’ कडे प्रशासनाचे दुर्लक्ष…. म्हणून दिसेल तिथे ‘हेच’ सुरू आहे..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली :खबऱ्या प्रतिनिधी : येथील शंभरफुटी रस्त्यावरील मुस्ताक रफीक शेख या रिक्षाचालकाचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड मिळून 55 हजारांचा ऐवज लंपास केला.

रविवारी रात्री चोरीची ही घटना उघडकीस आली. दरम्यान, शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

रफीक शेख पाकिजा मस्जीदमागे साई कॉलनीत गल्ली क्रमांक दोनमध्ये राहतात. शेख कुटुंबासह दि. 14 मे रोजी सायंकाळी त्यांच्या सासरवाडीला गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी शेख यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी उचकटून आत प्रवेश केला. स्वयंपाक खोलीत कपाट होते. त्याला कुलूप होते. हे कुलूप चोरट्यांनी तोडले. लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा 55 हजारांचा ऐवज लंपास केला. हॉलमधील साऊंड सिस्टीमही चोरट्यांनी पळविली.शेख कुटुंब रविवारी रात्री घरी आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. शहर पोलिसांनी पंचनामा केला. शेख यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेऊन चोरी केली असण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दिवसापासून शहरात बंद घरे चोरटे फोडत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

सांगली जिल्हा न्यायालयात बनावट दस्तऐवज , दोघांवर गुन्हा दाखल…

Next Post

एक व्यक्ती एक पद : कोल्हापूरसह सांगली, पुणे जिल्हाध्यक्ष बदलणार ..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
एक व्यक्ती एक पद : कोल्हापूरसह सांगली, पुणे जिल्हाध्यक्ष बदलणार ..?

एक व्यक्ती एक पद : कोल्हापूरसह सांगली, पुणे जिल्हाध्यक्ष बदलणार ..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group