• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | इस्लामपूर न्यायालयात आघाडी सरकारमधील ‘या’ नेत्याच्या विरोधात फिर्याद दाखल…

Admin by Admin
May 14, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

इस्लामपूर : खबऱ्या प्रतिनिधी ; राष्ट्रवादीचे आमदार अमाेल मिटकर यांनी जाहीर सभेत हिंदू धर्माचा अवमान केल्याप्रकरणी येथील ॲड.विद्याधर कुलकर्णी यांनी इस्लामपूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे. ७ सप्टेंबर रोजी याबाबत सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवार संवादयात्रेत मिटकर यांनी २१ एप्रिल २२ रोजी इस्लामपूरच्या जाहीर सभेत हिंदू विवाह धर्मपरंपरा व चालीरीतीपैकी कन्यादान या विधीची टिंगल उडवली. यामध्ये कुठेही विवाह लावणारे पुरोहित वधू किंवा वराचा हात हातामध्ये घेत नाहीत. ‘मम भार्या समर्पयामी’ असा मंत्र किंवा संकल्पही विधीमध्ये नाही. तरीदेखील जाहीर सभेत टिंगल करत मिटकरी यांनी हिंदू धर्मावर विश्वास असणाऱ्या व हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तसेच जाती-धर्मामध्ये तेढ उत्पन्न करणारे असे हे त्यांचे वक्तव्य आहे.

या जाहीर सभेमध्ये विवाह विधी, कन्यादान या विषयाचा कोणताही संबंध नसताना, ही राजकीय सभा सुरू असताना मुद्दामहून हा विषय काढून मिटकरी यांनी हिंदू धर्मातील एका उच्च परंपरेची टिंगल केली आहे. त्यांनी भा.दं.वि. कलम २९५ अ प्रमाणे गुन्हा केला असल्याने त्यांना कठोर शासन व्हावे, असे ॲड. कुलकर्णी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

परवानगीसाठी शासनाकडे अर्ज

मिटकर हे विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल करताना त्याला राज्य शासनाची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे कुलकर्णी यांनी ही खासगी फिर्याद चालवण्यासाठी पूर्वपरवानगी मागणारा अर्ज राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवला आहे. ती परवनगी मिळाल्यानंतर हे कामकाज चालू शकणार आहे. तोपर्यंत सुनावणीसाठी ७ सप्टेंबर ही तारीख देण्यात आली आहे.

Previous Post

शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…..

Next Post

‘हा काळा पैसा आहे, अर्धी रक्कम आम्हाला दे…’ एक धाड ; अन पोलिसांवर उलटला डाव…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘हा काळा पैसा आहे, अर्धी रक्कम आम्हाला दे…’ एक धाड ; अन पोलिसांवर उलटला डाव…

'हा काळा पैसा आहे, अर्धी रक्कम आम्हाला दे...' एक धाड ; अन पोलिसांवर उलटला डाव...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group