• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘हा काळा पैसा आहे, अर्धी रक्कम आम्हाला दे…’ एक धाड ; अन पोलिसांवर उलटला डाव…

Admin by Admin
May 14, 2022
in क्राईम, माफ करा स्पष्ट बोलतो, शोध पत्रकारिता
1 min read
0
‘हा काळा पैसा आहे, अर्धी रक्कम आम्हाला दे…’ एक धाड ; अन पोलिसांवर उलटला डाव…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एका खेळणी व्यापाऱ्याच्या घरी धाड पडते… ३० कोटींचे घबाड सापडते… पोलिस ठाण्यात पैसे मोजले जातात… एकीकडे गयावया तर दुसरीकडे ‘तोडपाणी’ची भाषा…

दोन कोटींत सेटलमेंट होते… पण प्रत्यक्षात सहा कोटी हडपून उर्वरित २४ कोटी परत दिले जातात… घटनेच्या एक महिन्यानंतर गुन्हा उघडकीस येतो आणि सहा कोटी पचवण्याआधीच पोलिसांवर डाव उलटतो… एखाद्या मालिकेतील ‘क्राईम स्टोरी’लाही लाजवेल असा घटनाक्रम घडला आहे चक्क मुंब्य्रात! तोतया पोलिसांनी धाड टाकून हजारो, लाखो रुपये लुबाडल्याचे अनेक किस्से आतापर्यंत ऐकण्यात येत होते, पण ठाणे पोलिस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या संवेदनशील अशा मुंब्य्रात पोलिसांनीच घातलेल्या धाडीने चक्रावून टाकणाऱ्या गुढकथा आता समोर येत आहेत.

मुस्लिमबहुल असलेला मुंब्रा कधी बेकायदा बांधकामांमुळे, तर कधी दहशतवादी कारवायांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या ‘कुकृत्या’मुळे मुंब्रा पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. एखाद्या क्राईम स्टोरीसारखीच ही पटकथा भासावी, अशी घटना येथे घडली. तारीख होती १२ एप्रिल २०२२… वेळ मध्यरात्रीची ठिक साडेबाराची… येथील बॉम्बे कॉलनीत राहणाऱ्या खेळणी व्यापारी फैजल मेमन यांच्या घरी ‘काळा पैसा’ येणार असल्याची कुणकुण मुंब्रा पोलिसांना लागते. पोलिसांचे पथक घरी पोहोचते व एक एक करत ३० खोके उचलून पोलिस ठाण्यात आणले जातात. खोके उघडल्यावर त्यात नोटांची बंडले पाहून पोलिसही चक्रावतात. प्रत्येक खोका उघडला जातो. एक कोटीला एक खोका बोलतात, हे आतापर्यंत ऐकण्यात होते, पण येथे प्रत्यक्ष एका खोक्यात एक कोटी!

‘हा काळा पैसा आहे, अर्धी रक्कम आम्हाला दे…’ अशी दमदाटी पोलिसांकडून सुरू झाली; परंतु हा काळा पैसा नाही हे पटवून देण्यात फैजल मेमन यशस्वी होतात. पण हाती आलेली लक्ष्मी अशीच कशी जाऊ द्यायची? मग सुरू होते तडजोडीची भाषा… दोन कोटींवर ही सेटलमेंट होतेही, पण पोलिसांची लालच वाढते आणि सहा खोके आपल्याकडे ठेवून फैजल यांना ‘रफादफा‘ केले जाते. फैजल यांच्या म्हणण्यानुसार तो त्यांच्या घामाचा पैसा होता, मात्र पोलिसांनी मारलेल्या डल्ल्याची फिर्याद इब्राहिम शेख नावाच्या एका तिऱ्हाईकाने (तिसऱ्याच व्यक्तीने) ठाणे पोलिस आयुक्तांसह थेट गृहमंत्र्यांपर्यंत केली. आणि एकूणच ठाणे पोलिसांची धडधड वाढवणाऱ्या या धाडसत्राचे एका महिन्याने ९ मे रोजी बिंग फुटले. पोलिस आयुक्त जयजित सिंह यांनी तातडीने दखल घेत या सर्व ‘लूटधाड’मध्ये गुंतलेल्या मुंब्रा पोलिस ठाण्याच्या १० जणांना निलंबित केले.

पोलिस निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक रवि मदाने, हर्षल काळे, पोलिस कर्मचारी पंकज गायकर, जगदीश गावीत, दिलीप किरपा, प्रवीण कुंभार, अंकुश वैद्य, ललित महाजन, नीलेश साळुंखे अशी या आरोपींची नावे आहेत. एकाच वेळी एकाच पोलिस ठाण्यातील १० जण निलंबित होण्याची ठाण्यातील ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या मुंब्रा पोलिस ठाण्यात अक्षरशा शुकशुकाट पसरला आहे. पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे याप्रकरणी तपास करत आहेत. मात्र एकूणच या सर्व प्रकारामुळे पोलिस, लुटला गेलेला व्यापारी आणि अर्जदार सगळेच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अनेक गुढकथांना जन्म देणारी ही पटकथा ठरत असून, ‘पिक्चर तो अभी बाकी है…’ अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मेमनही संशयाच्या भोवऱ्यात
मुंब्रा पोलिसांनी ज्यांच्या घरी धाड टाकून ३० कोटी रुपये हस्तगत केले ते फैजल मेमन खेळणी व्यापारी असल्याचे प्रथम समोर आले. मात्र त्यांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फैजल हे खेळणी व्यापारी नसून मुंबईतील मनीष मार्केटमध्ये असलेल्या हाजी नूर या प्रसिद्ध खेळणी व्यापाऱ्याकडे कामगार आहेत. फैजल अनेक वर्षांपासून बॉम्बे कॉलनीत वास्तव्याला असून, त्यांची आई मुंब्य्रातच प्लास्टिक पिशव्या विकण्याचा व्यवसाय करते. मग फैजल मेमनकडे इतके पैसे आले कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धक्कादायक म्हणजे १२ एप्रिलपासून फैजल आईसह २४ कोटी रुपये घेऊन घराला टाळे ठोकून गायब झाले आहेत. ते कुठे आहेत, याची कोणतीच माहिती नसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले; तर दुसरीकडे तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अर्जामध्ये ज्या व्यापाऱ्याचे नाव फैजल असे नमूद केले आहे. मुळात त्याचे नाव सर्फराज आहे. तो खेळणी व्यापारीच असून मुंबईतून होलसेल खेळणी घेऊन ठाणे आणि परिसरातील दुकानदारांना वितरित करत असे. दरम्यान, घटनेच्या दिवसापासून गायब असलेले फैजल दोन दिवस आधीच तपास अधिकाऱ्यासमोर हजर झाले होते. दोन दिवसांत त्यात ३० कोटींच्या रकमेबाबत सर्व बिलांसह खुलासा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निःष्पक्ष तपास होणार का?
आतापर्यंत या प्रकरणात तीन अधिकारी, सात कर्मचारी निलंबित झाले आहेत, तर दोन अधिकाऱ्यांची चौकशी सुरू होणार आहे; मात्र ही चौकशी निःष्पक्ष होणार का, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी झोन एकचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याकडे सोपवली आहे. वास्तविक अशा प्रकरणात निवृत्त न्यायाधीश किंवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी करणे अपेक्षित असते; मात्र डल्ला मारलेल्या सहा कोटींचे वाटप मुंब्रा पोलिस ठाण्यातील शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत, तसेच ठाणे पोलिस दलातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत झाल्याचा आरोप होत आहे.

अर्जदाराचा शोध सुरू
ज्या व्यापाराला लुटले गेले, त्याने अद्याप कोणतीही तक्रार पोलिस ठाण्यात केली नाही, तर एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी, तसेच शेख इब्राहिम पाशा नावाच्या मुंब्र्यातीलच स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी अर्जावर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. हे दोघेही अर्जदार गायब असून आता पोलिस जबाब नोंदवण्यासाठी त्यांचा शोध घेत आहेत.

काही प्रश्नचिन्ह
संपूर्ण ठाणे पोलिस दलाला हादरवून टाकणाऱ्या या ‘लूटधाड’बाबतच्या तपासासह कथित व्यापारी मेमन, फिर्यादी शेख यांच्याबाबतही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

प्रश्न क्रमांक १ : या धाडीसंदर्भात आणि नंतर पोलिसच आरोपी निघाल्यावर याप्रकरणी अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही?

प्रश्न क्रमांक २ : पोलिसांचे निलंबन झाले, पण त्यांच्यावर खंडणी, लुटमार असे गुन्हे का दाखल झाले नाहीत?

प्रश्न क्रमांक ३ : सहा कोटी पचवायचे तर ते एकट्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या आवाक्यात नाहीत. मग त्यात कोणते वरिष्ठ अधिकारी गुंतले आहेत?

प्रश्न क्रमांक ४ : फैजल मेमन जर साधा कामगार आहे व त्यांची आई प्लास्टिक पिशव्या विकायची, तर त्यांच्याकडे इतकी रक्कम कशी आली?

प्रश्न क्रमांक ५ : एक मालक नोकराकडे इतकी मोठी रक्कम ठेवायला का देईल. तसेच मेमन हे व्यापारी असले हे सिद्ध झाले तरी त्यांच्याकडे इतकी मोठी रक्कम कशी आली?

प्रश्न क्रमांक ६ : फैजल निर्दोष आहेत, तर मग ते समोर का येत नव्हते? त्यांनी तक्रार का दाखल केली नाही? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे?

प्रश्न क्रमांक ७ : हवालासाठी ही रक्कम वापरणार होते का?

Previous Post

सांगली | इस्लामपूर न्यायालयात आघाडी सरकारमधील ‘या’ नेत्याच्या विरोधात फिर्याद दाखल…

Next Post

भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण..

भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण..

Recent Stories

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

by Admin
August 9, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज पूर्व भागातील सोनी-पाटगाव येथे शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगार...

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

by Admin
August 8, 2026
0

पाच रुग्ण आढळले; सर्वेक्षण, उपचार सुरू : झोपडपट्टी हिवताप संवेदनशील, धोका वाढला खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज येथील सांगली-मिरज...

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

by Admin
July 31, 2026
0

चारचाकी व दुचाकीची समोरासमोर भीषण धडक; गाडी थेट ओढ्यात खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या विटा-खानापूर मार्गावरील बळवंत महाविद्यालयासमोरील ओढ्याच्या वळणावर...

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली जिल्ह्यातील आरग-बेडग मार्गावर भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला धडक दिल्याने ४० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू...

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या नीट पेपर लिक प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेरीस राजीनामा दिला आहे. त्यानंतर केंद्र...

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने गुरुवारी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत मिशन हॉस्पिटल चौक,...

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या गुंडेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीत पुरविण्यात आलेल्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ९५ हजार रुपयांची...

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेकडून जन्म-मृत्यूचे बोगस दाखले देण्यात आल्याचा आरोप तथ्यहीन असून शासनाच्या नियमांनुसार आणि आवश्यक कागदोपत्री पुरावे...

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या पोलिस असल्याची बतावणी करून सातारा-पंढरपूर मार्गावरील वर्धनगड घाट येथे रात्री रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनचालकांना अडवून...

ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

सरकारी नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल २२ लाख २७ हजार ५००...

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

by Admin
July 15, 2026
0

नागाव येथील घटना; ११ तोळे सोन्यासह १३ लाखांचा ऐवज लंपास खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील माळवाडी...

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

by Admin
July 14, 2026
0

सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत होते. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या...

‘त्या’ खून प्रकरणी पालकमंत्री संतापले..! खुनातील संशयितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यानुसार कारवाई होणार..!

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेबाबत सांगली महापालिकेकडून अपमान ? सत्ताधारी पदाधिकारी चुपचाप..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेच्या वाढीव घरपट्टीविरोधात शहरात असंतोषाचे वातावरण असताना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून...

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहरातील कृष्णा नदी परिसरात आज मंगळवारी सकाळी खळबळजनक घटना समोर आली आहे. दररोज सकाळी...

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरलीय, हि दहशत कोणी चोरट्याची किंवा पोलिसांची अथवा भुताची...

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

by Admin
July 14, 2026
0

नियोजन बैठकीत विविध विभागांवर सोपवल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा दि. २१...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group