• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोल्हापूर विमानतळावर ड्रग्ज सापडले; कर्मचाऱ्यास अटक

Admin by Admin
July 14, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कोल्हापूर विमानतळावर ड्रग्ज सापडले; कर्मचाऱ्यास अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कोल्हापूर विमानतळावरील कंत्राटी कर्मचाऱ्यास ड्रग्ज तस्करीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. शनिवारी सकाळी दिल्ली येथील पैलवानाने सोबत आणलेले चरस डस्टबिनमध्ये टाकले होते. ते विक्रीची जबाबदारी सोपवलेल्या ओंकार अर्जुन मिठारी (वय २७, रा. गणेश कॉलनी, उचगाव) या विमानतळावरील कंत्राटी कर्मचाऱ्याला अटक केली. त्याच्याकडून ७१ ग्रॅम चरस, दुचाकी असा सुमारे १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पैलवानकीसाठी दिल्लीहून आला.. सोबत चरस आणले

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना उचगाव- गडमुडशिंगी रोडवर चरस विक्रीसाठी एक तरुण येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने रविवारी रात्री सापळा रचून ओमकार मिठारीला ताब्यात घेतले. ओमकार विमानतळावर कंत्राटी पद्धतीने बेल्ट ऑपरेटर म्हणून नोकरीस असून शनिवारी सकाळी चेकिंग काँटरच्या नजीक डस्टबीनमध्ये हा चरस मिळाल्याची कबूली दिली. त्याच्या चौकशीतून मयूर माने याचे नाव निष्पण्ण झाल्याने त्यालाही ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, गोकुळ शिरगावचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार संतोष बरगे, सत्यजित तानुगडे, शिवानंद मठपती, विशाल खराडे यांनी ही कारवाई केली.

दिल्ली कनेक्शन

दिल्ली येथील एक पैलवान महिन्याभरापासून कोल्हापुरात वास्तव्यास होता. त्यानेच हे चरस विमानतळावर फेकल्याची चर्चा समोर आली आहे. हा पैलवान शनिवारी (दि. ११) सकाळी ९ वाजताच्या विमानाने मुंबई आणि तेथून दिल्लीला गेल्याचे उघड झाले आहे. त्याचा शोध सुरू असून, लवकरच त्याची चौकशी करण्यात येणार आहे. ओमकार उच्चशिक्षित असून त्याच्या मोबाईलमधून अनेक बाबींचा उलगडा होणार आहे.

Previous Post

वारीसाठी सातारा पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्था, २७०० हून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तावर, २४ सराईत गुन्हेगार तडीपार

Next Post

कोल्हापुर | शासकीय रुग्णालयाच्या बांधकामात त्रुटी; थर्ड पार्टीकडून चौकशी करूनच कामाचे बिल मंजूर करणार– मंत्री हसन मुश्रीफ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोल्हापुर | शासकीय रुग्णालयाच्या बांधकामात त्रुटी; थर्ड पार्टीकडून चौकशी करूनच कामाचे बिल मंजूर करणार– मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापुर | शासकीय रुग्णालयाच्या बांधकामात त्रुटी; थर्ड पार्टीकडून चौकशी करूनच कामाचे बिल मंजूर करणार– मंत्री हसन मुश्रीफ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group