• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | जयंत पाटलांना धक्क्यावर धक्के! नगराध्यक्षानंतर दोनच दिवसात नगरसेवक अपात्र, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे ‘जलदगती’ने निकाल

Admin by Admin
July 13, 2026
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

दोनच दिवसांपूर्वी (११ जुलै) ईश्वरपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांना अपात्र केल्यानंतर आता सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना आणखी एक धक्का दिला आहे. जयंत पाटील गटाच्या आणखी एका नगरसेवकाला अवैध बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलं आहे. सुनील मलगुंडे असं त्या नगरसेवकाचं नाव असून ते अपात्र ठरलेले नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे बंधू आहेत. त्यामुळे दोन्ही भावांना अपात्र ठरवल्याने आता त्याची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.

नगरसेवक सुनील मलगुंडे यांना अवैध बांधकाम प्रकरणी अपात्र ठरवण्यात आलं आहे. सुनील मलगुंडे यांनी मिळकतीमध्ये अतिक्रमण करुन बांधकाम केले असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय दिला.

सुनील मलगुंडे हे ईश्वरपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १३ मधून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी ईश्वरपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनाही अवैध बांधकाम प्रकरणातच अपात्र ठरवण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये ईश्वरपूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली होती. कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली होती. मात्र जयंत पाटील यांनी होमग्राऊंडवर पुन्हा एकदा विजय मिळवला.

ईश्वरपूरचे पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी (शरद पवार) – २२

भाजप – ३
राष्ट्रवादी (अजित पवार) – ३
शिवसेना – २

नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई

पेठ-सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून त्यावर अवैध बांधकाम केल्याचा ठपका ठेवत ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केल्याचं दिसून आलं. आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांची एकत्रित मालकीची पेठ सांगली रोडला बसस्थानकाजवळ लॉजिंग व शॉपिंग सेंटर इमारत आहे. ही इमारत ही पेठ सांगली राज्यमार्गाला अगदी खेटून उभी आहे. या इमारतीच्या बांधकाम परवानगी व नियमितीकरणाबाबतची माहिती व बांधकाम नियमितीकरणाबाबतची सर्व माहिती जयकुमार जाधव यांनी माहिती अधिकारात मागवली होती. नंतर ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देत आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद रद्द करावे, यासाठी अर्ज देण्यात आला होता.

आता या प्रकरणात सुनावणी पूर्ण होऊन सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी आधी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. त्यानंतर त्यांचे बंधू नगरसेवर सुनील मलगुंडे यांच्यावरदेखील अपात्रतेची कारवाई केली आहे.

नगराध्यक्षानंतर नगरसेवकपदही अपात्र झाल्याने तो जयंत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. या दोन्ही पदांसाठी पुन्हा एकदा पोटनिवडणूक पार पडणार हे निश्चित. त्यामुळे ईश्वरपूरच्या राजकारणात आगामी काळात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

Previous Post

खळबळजनक | दहा रुपयांचा चहा अन् काय घडलं पहा..!

Next Post

दुःखद बातमी | तीन महिला वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू, मिरज तालुक्यातील कवलापूर, क.डिग्रज, मालगाव तीनही गावात शोककळा, व्यवहार ठप्प..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दुःखद बातमी | तीन महिला वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू, मिरज तालुक्यातील कवलापूर, क.डिग्रज, मालगाव तीनही गावात शोककळा, व्यवहार ठप्प..!

दुःखद बातमी | तीन महिला वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू, मिरज तालुक्यातील कवलापूर, क.डिग्रज, मालगाव तीनही गावात शोककळा, व्यवहार ठप्प..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group