• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दुःखद बातमी | तीन महिला वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू, मिरज तालुक्यातील कवलापूर, क.डिग्रज, मालगाव तीनही गावात शोककळा, व्यवहार ठप्प..!

Admin by Admin
July 13, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
दुःखद बातमी | तीन महिला वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू, मिरज तालुक्यातील कवलापूर, क.डिग्रज, मालगाव तीनही गावात शोककळा, व्यवहार ठप्प..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

पंढरीला निघालेल्या तीन महिला वारकरी सोमवारी सकाळी जेजुरीजवळ झालेल्या अपघातात ठार झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे, तर मिरज तालुक्यातील तीन गावात शोककळा पसरली असून आज दिवसभर गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.

आज सकाळी आठ वाजणेच्या सुमारास जेजुरी ते सासवड मार्गावर बेलसर टोल नाक्याजवळ पायी निघालेल्या वारकर्‍यांच्या दिंडीत ट्रक घुसल्याने मोठी दुर्घटना घडली. दिंडीत सांगली जिल्ह्यातील वारकरी असलेल्या समूहातच ट्रक घुसल्याने मिरज तालुक्यातील तीन महिला वारकरी ठार झाल्या आहेत. यामध्ये मिरज तालुक्यातील कवलापूर येथील रहिवाशी नंदा पवार (वय ६०), मालगाव येथील राजश्री सलगरे (वय ५५) आणि कसबे डिग्रज येथील राजश्री भोसले (वय ५५) या महिला वारकर्‍यांचा समावेश आहे. तर अपघातात आक्काताई कोळी (शिरगाव), शांता कालकोपर (मिरज), कासाबाई रास्ते, लक्ष्मी गर्दे (रा.कवठेमहांकाळ) आणि शामराव चव्हाण (सांगली) हे वारकरी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने वेगवेगळ्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचे वृत्त संबंधित वारकर्‍यांच्या नातेवाईकांना घटना घडल्यानंतर तात्काळ कळविण्यात आले. यानंतर संबंधितांचे नातेवाईक तातडीने पुण्याकडे रवाना झाले असून जखमींची प्रकृर्ती अस्वस्थ असल्याने गावात असलेल्या घरच्या मंडळींचा चिंताग्रस्त झाले आहेत.

वारकर्‍यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात प्रामुख्याने मिरज तालुक्यातील तीन महिला वारकर्‍यांचा दुर्देवी अंत झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. पंढरीच्या वाटेवर मुखी हरीनाम घेत पायी चालत निघालेल्या वारकर्‍यांच्या दिंडीत ट्रक घुसलाच कसा असा सवाल उपस्थित केला जात असून तालुक्यात तीनही गावात शोककळा पसरली आहे. जखमी वारकर्‍याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे याची एकमेकाकडून माहिती घेतली जात आहे. मात्र, संबंधित वारकर्‍यांचे नातेवाईक घटनास्थळाहून आल्यानंतरच नेमकी परिस्थिती समोर येणार आहे. कवलापूर, मालगाव आणि कसबे डिग्रज ही तीन गावे तर आज शोकमग्न झाली असून गावात एकच दिंडीतील मृत महिलांच्या पापभिरू स्वभावाची चर्चा सुरू होती.

कसबे डिग्रज येथील संत ज्ञानेश्‍वर माउली दिंडी या नावाने गेल्या तीन दशकापासून आळंदी ते पंढरपूर अशी दिंडी काढण्यात येते. यावर्षी डिग्रज गावासह अन्य गावातील सुमारे ११० वारकरी दिंडीत सहभागी झाले असून यामध्ये ४५ महिला आहेत. सासवडचा मुक्काम झाल्यानंतर दिंडी पंढरीच्या दिशेने रवाना झाल्यानंतर हा अपघात घडला असून आज रात्री उशिरा पार्थिव गावात आणण्यात येणार असून उद्या सकाळी अंत्यविधी होतील असे वारकरी संप्रदायातील जेष्ठ लोकांनी सांगितले.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | जयंत पाटलांना धक्क्यावर धक्के! नगराध्यक्षानंतर दोनच दिवसात नगरसेवक अपात्र, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे ‘जलदगती’ने निकाल

Next Post

सातारा DPDC बैठकीत विकासापेक्षा महायुतीच्या केमिस्ट्रीचीच चर्चा: उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंची मिश्कील जुगलबंदी, गोरे-मोहिते वादाचेही पडसाद

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सातारा DPDC बैठकीत विकासापेक्षा महायुतीच्या केमिस्ट्रीचीच चर्चा: उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंची मिश्कील जुगलबंदी, गोरे-मोहिते वादाचेही पडसाद

सातारा DPDC बैठकीत विकासापेक्षा महायुतीच्या केमिस्ट्रीचीच चर्चा: उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंची मिश्कील जुगलबंदी, गोरे-मोहिते वादाचेही पडसाद

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group