• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खळबळजनक | दहा रुपयांचा चहा अन् काय घडलं पहा..!

चहाविक्रेत्याने केला ग्राहकाचा खून!

Admin by Admin
July 12, 2026
in क्राईम
1 min read
0
खळबळजनक | दहा रुपयांचा चहा अन् काय घडलं पहा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

चहा घेतल्यानंतर चहाचे दहा रुपये न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीत चहा विक्रेत्याने ग्राहकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना आज रविवारी दुपारी चार वाजता कपीलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नारी-नारा परिसारत घडली. मनोज विश्वनाथ यादव (४५) रा. दर्शननगर, नंदनवन असे खून झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. कैलास लालचंद गणवीर (४२) रा. न्यू म्हाडा कॉलनी, उप्पलवाडी असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज यादव हा एका डेकोरेशन मालकाकडे कामाला होता. रविवारी सकाळी तो उप्पलवाडी परिसरात मंडप बांधण्यासाठी गेला होता. दुपारी तीनच्या सुमारास तो कैलासच्या चहाटपरीवर चहा पिण्यासाठी गेला होता. चहा घेतल्यानंतर त्याने चहाचे दहा रुपये दिले नाही. त्यामुळे चहाविक्रेत्याने मनोजला चहाचे दहा रुपये मागितले. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार दिला आणि शिवीगाळ केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादावादीत मनोजने कैलासच्या पत्नीसमोर त्याला एक थापड मारली. त्यामुळे कैलास संतप्त झाला. त्याने धारदार शस्त्राने मनोजच्या मानेवर वार केला. त्यामुळे तो कोसळला. उपचारासाठी त्याला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. ठाणेदार सतीश आडे यांच्या पथकाने तासाभरात आरोपीला अटक केली.

Previous Post

विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

Next Post

मोठी ब्रेकिंग | जयंत पाटलांना धक्क्यावर धक्के! नगराध्यक्षानंतर दोनच दिवसात नगरसेवक अपात्र, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे ‘जलदगती’ने निकाल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

मोठी ब्रेकिंग | जयंत पाटलांना धक्क्यावर धक्के! नगराध्यक्षानंतर दोनच दिवसात नगरसेवक अपात्र, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे 'जलदगती'ने निकाल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group