• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कृष्णेत सापडला तब्बल ३५ किलोचा मासा ; पाहण्यासाठी मोठी गर्दी…

Admin by Admin
May 14, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
कृष्णेत सापडला तब्बल ३५ किलोचा मासा ; पाहण्यासाठी मोठी गर्दी…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पलूस / खबऱ्या प्रतिनिधी : एक-दोन किलोचे वाम, मरळ मासे म्हणजे कृष्णा नदीतील मासेमारांची चैन पाच-सात किलोचा मासा सापडला तरी जल्लोष करावा, अशी स्थिती. अशावेळी दह्यारी (ता. पलूस) दोन मासेमारांना तब्बल ३५ किलो वजनाचा कटला जातीचा मासा सापडला आहे. मासेमारीच्या आनंदाला उधाण आले. नदीत एवढा मोठा मासा आढळणून येण्याची पहिली घटना आहे. एवढा मासा सापडणे तसे दुर्मिळ आहे.

मच्छीमार अनिल देवळकर व रवींद्र मदने यांना कृष्णा नदी पात्रात मासेमारी करताना कटला जातीचा मासा‌ सापडला. देवळकर मदने व लहानपणापासून नदीपात्रात मासेमारी करतात. कृष्णा नदी पात्रात माशांच्या अनेक जाती आहेत. शुक्रवारी पहाटे त्यांच्या गळाला हा मोठा मासा लागला आणि त्यांना विश्वासच बसेना. हा मासा इतका मोठा होता की या दोघांना नदीपात्रातून काढणे मुश्कील झाले. मासा बाहेर काढल्यानंतर परिसरातून बघ्यांची गर्दी झाली. नदीपात्रात अनेक जातींच्या माशांसह इतरही जलचर प्राणी असल्याने पाणी शुद्ध राहण्यास मदत होत असते.

नदीपात्रात कारखान्यांची मळी रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने या जलचर प्राण्यांच्या जाती नष्ट होत आहेत. अशावेळी एवढा मोठा मासा सापडणे आमच्यासाठी आश्चर्यच आहे.

– रवींद्र मदने, मासेमारी

Previous Post

पन्हाळा : दोन गव्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

Next Post

शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…..

शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले.....

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group