• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पन्हाळा : दोन गव्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

Admin by Admin
May 14, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पन्हाळा : दोन गव्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पोहाळे तर्फ बोरगाव व बाजार भोगाव (ता. पन्हाळा) गावांच्या हद्दीवर दोन गव्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाला. गव्यांच्या झुंजीत सुमारे पाच गुंठ्यातील उसाची नासाडी झाली.

याबाबत घटनास्थळ व बाजार भोगाव परिमंडळ वन अधिकारी नाथाजी पाटील यांनी दिलेली माहिती अशी : गव्यांचा कळप पोहाळे तर्फ बोरगाव व बाजार भोगाव हद्दीवरील पाय वाटेने गाव शिवारामध्ये येत होता. वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने दोन गव्यांची झुंज सुरू झाली. झुंज करत दोन्ही गवे आनंदा गणपती पाटील (रा. पोहाळे तर्फ बोरगाव, ता. पन्हाळा) यांच्या ‘शिव’ नावाच्या उसाच्या शेतात आले. दोन्ही गव्यामध्ये तुंबळ झुंज झाली. तेथूनच दोन्ही गवे तानाजी पाटील यांच्या शेतात पोहोचले. झुंजीमुळे दोन्ही शेतातील सुमारे पाच गुंठ्यातील ऊसाची नासाडी झाली. अखेर या दोन गव्यांच्या झुंजीत दमलेल्या एका गव्याचा हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाला. आज सकाळी शेतीकामासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्युमुखी पडलेला गवा दिसला. त्यांनी वनकर्मचाऱ्यांशी संपर्क साधून ही माहिती दिली.

बाजार भोगावचे परिमंडळ वन अधिकारी नाथा पाटील, वनरक्षक कुंडलिक कांबळे, महादेव कुंभार, संगीता देसाई, वनमजूर बाळू म्हामुलकर, नाथा पाटील, यशवंत पाटील, शंकर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत गव्याच्या अंगावर शिंगे लागल्याच्या खुणा आढळल्या.दरम्यान, मृत गव्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित रानभरे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृत गव्यावर शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

Previous Post

सां.मि. कु महापालिकेतील भाजपच्या अंतर्गत वादावर चंद्रकांत दादा घेणार अंतिम निर्णय…

Next Post

कृष्णेत सापडला तब्बल ३५ किलोचा मासा ; पाहण्यासाठी मोठी गर्दी…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कृष्णेत सापडला तब्बल ३५ किलोचा मासा ; पाहण्यासाठी मोठी गर्दी…

कृष्णेत सापडला तब्बल ३५ किलोचा मासा ; पाहण्यासाठी मोठी गर्दी...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group