• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मिरज पंचायत समिती इमारत लोकार्पण सोहळ्यात मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर माजी आमदार दिनकर पाटील व शिवसेना नेते बजरंग पाटील यांच्याकडून आ.जयंत पाटील, खा.विशाल पाटील, आ.इद्रिस नायकवडी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका..!

Admin by Admin
July 12, 2026
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | मिरज पंचायत समिती इमारत लोकार्पण सोहळ्यात मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर माजी आमदार दिनकर पाटील व शिवसेना नेते बजरंग पाटील यांच्याकडून आ.जयंत पाटील, खा.विशाल पाटील, आ.इद्रिस नायकवडी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व मिरजेचे आमदार डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रमुख हस्ते फित कापून, कोनशिलाचे उद्घाटन करून लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना माजी आमदार दिनकर पाटील म्हणाले, पैसे जनतेचे अन् सरकारचे पण सभागृहाला नावे यांच्या बाप – दादांची. आता फक्त संडास बाथरूम, आणि मूताऱ्यांनाच तेवढं त्यांच्या बाप-दादांची नावे द्यायची राहिली आहेत. आम्ही कामे आणतो तुम्ही नारळ फोडा असे म्हणत विरोधकांवर जोरदार टीका केली.

तर शिवसेना नेते बजरंग पाटील यांनी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वजण हे कर्तृत्वाने मोठे झाले आहेत. परंतु, खा. विशाल पाटील, आ. जयंत पाटील आणि आमदार इद्रिस नायकवडी हे वारसा हक्काने मोठे झालेत, असे म्हणून विरोधकांना डीवचल्याचे दिसून आले.

मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीतील सभागृहाला ‘छत्रपती संभाजी महाराज सभागृह’ असे नामकरण झाल्याचे घोषित करत जोरदार ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी मंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब होनमोरे, फारूक जमादार, नगरसेवक संदीप आवटी, डॉ.महेशकुमार कांबळे यांच्यासहित पंचायत समिती सदस्य व मिरज तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य यांच्यासहित कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

मिरज पंचायत समितीच्या नूतन सभागृहास छ. संभाजी महाराज सभागृह असे नाव, महाआघाडीत खळबळ..!

Next Post

काल अनधिकृत उद्घाटन केले आता आपली पावर दाखवा – आमदार सुरेश खाडे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
काल अनधिकृत उद्घाटन केले आता आपली पावर दाखवा – आमदार सुरेश खाडे

काल अनधिकृत उद्घाटन केले आता आपली पावर दाखवा - आमदार सुरेश खाडे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group