खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळ्यात आमदार सुरेश खाडे यांनी बोलताना आपल्या भाषाशैलीत विरोधकांचा चांगला समाचार घेतला. “हे पैसे माझ्या बापाचे नाहीत. जनतेचे अन् शासनाचे आहेत. तुम्ही खासदार आहे, तुम्हाला कळायला पाहिजे आपण कसं वागतो. तुम्ही खानदानी आहात, परंतु तुम्ही जर तुमची भाषेची मर्यादा ओलांडला तर आम्हाला सुद्धा आमची ताकद दाखवावी लागेल. इथून पुढे तुम्हाला तुमच्या बापाच्या पैशानेच विकास करावा लागेल हे मी इथं ठामपणे सांगतो. ” असे म्हणत खासदार विशाल पाटलांवरती निशाणा साधत आमदार सुरेश खाडेनी जोरदार टीकास्त्र सोडले.
आमदार खाडे पुढे म्हणाले, मंत्री महोदय जयकुमार गोरे हे खूप अभ्यासू मंत्री आहेत. काल काहींनी अनधिकृत उद्घाटन त्यांनी केलं आता आपली पॉवर दाखवा.
नारळ फोडण्यासाठी आम्ही गडी ठेवलेत..!
विरोधकांचा समाचार घेताना आमदार खाडे यांनी व्यासपीठावर जोरदार हल्ले चढवले. काल झालेल्या अनधिकृत उद्घाटन कार्यक्रमात काहींनी सभागृहास वसंतदादांचे नाव देण्याचे ठरवले आहे. जुन्या इमारतीतील सभागृहास वसंतदादा पाटील यांचे नाव आहे. काल उपस्थित असणाऱ्या खासदार आणि आमदारांनी थोडे विवेक बुद्धीने वागावं. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव सभागृहास देणे म्हणजे फार मोठं काम आहे. सांगली जिल्ह्यातील कोणत्याच सभागृहात छत्रपती संभाजी महाराजांचा नाव नाही, जिल्ह्यातील सर्वात पहिले नाव मिरजेतील पंचायत समितीच्या सभागृहास आम्ही दिले आहे.
आम्ही विकास काम खेचून आणू, मंदिरे, दवाखाने,इमारती बांधू आणि त्याच्या उद्घाटनाचे नारळ फोडण्यासाठी आम्ही कामाला गडी ठेवले आहेत. असे म्हणत निशाणा साधला.

