• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज पंचायत समितीच्या नूतन सभागृहास छ. संभाजी महाराज सभागृह असे नाव, महाआघाडीत खळबळ..!

Admin by Admin
July 12, 2026
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मिरज पंचायत समितीच्या नूतन सभागृहास छ. संभाजी महाराज सभागृह असे नाव, महाआघाडीत खळबळ..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा हा नेमका कधी.? व कोणी घ्यायचा याच्यावरून वादंग निर्माण झाले होते. श्रेय वादाच्या या लढाईमध्ये महाविकास आघाडी व भाजपच्या सोबत सत्तेत असणारे महायुतीतील मित्रपक्षांचे स्थानिक नेते एकसंधपणाने केवळ आणि केवळ भाजपच्या विरोधामध्ये मैदानात उतरले होते.

शनिवारी सायंकाळी भाजप विरोधी गटाने पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा माजी मंत्री जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी व शिवसेनेचे नेते मोहन वनखंडे यांच्या उपस्थितीत सभापती तन्वी कमलेकर यांना सोबत घेऊन केला होता. यावेळेस खासदार विशाल पाटील आणि प्रमुख नेत्यांनी भाजपच्या काही नेत्यांवरती टीकास्त्र सोडले होते.

परंतु त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. मिरज मतदार संघातील नेते, कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात या सोहळ्यास उपस्थिती दर्शवली होती.

सायंकाळी बऱ्याच उशिराने सुरू झालेल्या या कार्यक्रमात मात्र सभागृहास दिलेल्या नावाची चर्चा जोरदार होती. भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सभागृहाच्या नावावरून सर्वत्र खळबळ माजली होती. नूतन इमारतीमधील सभागृहास छ. संभाजी महाराज सभागृह असे नाव दिल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्ते व भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मात्र आनंदोत्सव साजरा करताना दिसून आले.

Previous Post

कुपवाडमधील उद्योजकाची ७९ लाखांची फसवणूक

Next Post

ब्रेकिंग | मिरज पंचायत समिती इमारत लोकार्पण सोहळ्यात मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर माजी आमदार दिनकर पाटील व शिवसेना नेते बजरंग पाटील यांच्याकडून आ.जयंत पाटील, खा.विशाल पाटील, आ.इद्रिस नायकवडी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मिरज पंचायत समिती इमारत लोकार्पण सोहळ्यात मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर माजी आमदार दिनकर पाटील व शिवसेना नेते बजरंग पाटील यांच्याकडून आ.जयंत पाटील, खा.विशाल पाटील, आ.इद्रिस नायकवडी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका..!

ब्रेकिंग | मिरज पंचायत समिती इमारत लोकार्पण सोहळ्यात मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर माजी आमदार दिनकर पाटील व शिवसेना नेते बजरंग पाटील यांच्याकडून आ.जयंत पाटील, खा.विशाल पाटील, आ.इद्रिस नायकवडी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group