प्रकरणाचा सखोल, जलदगतीने तपास करण्याची मागणी
कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाबूकस्वारवाडी (ता. मिरज) येथे अवघ्या नऊ महिन्यांच्या बालिकेवर तिच्याच काकूकडून अमानुष मारहाण व क्रूर वागणूक दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित महिलेविरुद्ध तातडीने गुन्हा नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून बालिका सतत रडत असल्याने तिच्या आईला संशय आला. सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी आईने घरात मोबाइलद्वारे गुप्तपणे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. या व्हिडीओमध्ये संबंधित महिला बालिकेला लाथा मारणे, हाताने मारहाण करणे, चिमटे काढणे, एका हाताने उचलून जोराने झटके देणे, तसेच तिच्याशी अत्यंत क्रूर वागणूक देत असल्याचे दिसून आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणातील व्हिडीओ तातडीने जप्त करून त्याचे फॉरेन्सिक परीक्षण करण्यात यावे, बालिकेची वैद्यकीय तपासणी करून दुखापतींची नोंद घ्यावी, तसेच उपलब्ध पुरावे व साक्षीदारांच्या आधारे संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोठे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख इमरान मुजावर, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख जुबेर शेख, शैलेश मठपती, दस्तगीर मुल्ला यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोठे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख इमरान मुजावर, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख जुबेर शेख, शैलेश मठपती, दस्तगीर मुल्ला यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रकरणाचा सखोल, जलदगतीने तपास करण्याची मागणी
याशिवाय, बालिकेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना करून प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल आणि जलदगतीने तपास करण्यात यावा, तसेच कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेऊन दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. ही मागणी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन कौन्सिलचे सांगली जिल्हाध्यक्ष देवधर सांगले यांनी केली.


