• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीतील ‘एन.जी. ग्रुप’वर मोक्काचा शिक्का

Admin by Admin
July 8, 2026
in क्राईम
1 min read
0
सांगलीतील ‘एन.जी. ग्रुप’वर मोक्काचा शिक्का
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बालकासह ९ आरोपी कायद्याच्या कचाट्यात

विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची मंजुरी

संघटित गुन्हेगारीविरोधात सांगली पोलिसांची मोठी कारवाई

सांगली शहरातील वेदांत मारुती बंडगर खून प्रकरणात महत्त्वाची कारवाई करत ‘एन.जी. ग्रुप’ या संघटित गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) लागू करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र रंजन कुमार शर्मा यांनी बालकासह नऊ आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाईस मंजुरी दिल्याने जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीविरोधातील ही मोठी आणि निर्णायक कारवाई मानली जात आहे.

संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वेदांत बंडगर खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे करीत आहेत. तपासादरम्यान टोळीप्रमुख निलेश विठोबा गडदे याने साथीदारांसह ‘एन.जी. ग्रुप’ नावाची संघटित गुन्हेगारी टोळी स्थापन करून आर्थिक फायद्यासाठी आणि परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

तपासात या टोळीने सन २०१७ पासून खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अपहरण, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जीवे मारण्याच्या धमक्या, अंमली पदार्थांची लागवड तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे केल्याचे समोर आले आहे. सांगली, मिरज, कुपवाड, जत, कवठेमहांकाळसह कर्नाटकातील काही भागातही या टोळीचे जाळे सक्रिय असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

सरकारी अभियोक्त्यांचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी प्रस्ताव पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे सादर केला. पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावाची छाननी करून तो विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मंजुरीसाठी पाठविला. प्रस्तावाचा सखोल अभ्यास केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी आरोपींवर मोक्का कायद्याची कलमे लावण्यास मंजुरी दिली.

या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, भविष्यात अशा टोळ्यांवरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास संदीप भागवत, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर), सांगली यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Previous Post

ब्रेकिंग | हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली डीसिसी बँकेतील ४४४ पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश

Next Post

नऊ महिन्यांच्या बालिकेचा चुलतीकडून अमानुष छळ, सांगली जिल्ह्यातील प्रकार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नऊ महिन्यांच्या बालिकेचा चुलतीकडून अमानुष छळ, सांगली जिल्ह्यातील प्रकार

नऊ महिन्यांच्या बालिकेचा चुलतीकडून अमानुष छळ, सांगली जिल्ह्यातील प्रकार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group