खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचा राजारामनगर येथे राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात नूतन संचालक लिंबाजी पाटील, संभाजी पाटील, अॅड. संग्राम पाटील, जे. डी. मोरे, सुनिल पाटील, दयानंद पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. डॉ. सुरेश भोसले यांनी कृष्णा कारखान्याचे साखर वाळवा तालुक्यातील नूतन संचालक तसेच राजारामबापू उद्योग समूहातील पदाधिकाऱ्यांसमवेत राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर दिवंगत बापूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले की, कृष्णा व राजारामबापू साखर कारखान्याने सातत्याने हातात हात घालून कृष्णा नदीकाठचा शेतकरी व साखर कामगारांचे हित साधले आहे. साखर कारखानदारी टिकविण्याची जबाबदारी सर्वांवर आहे. त्यादृष्टीने काम करूया. देवराज पाटील म्हणाले, राजारामबापू व कृष्णा या दोन्ही साखर कारखान्यांनी आमदार जयंतराव पाटील, डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने परिसरातील शेतकरी व कामगारांचे प्रश्न सोडविले आहेत. लोकनेते राजारामबापू पाटील, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले, दिवंगत यशवंतराव मोहिते यांनी उभारलेल्या या सहकारी संस्था टिकवल्या पाहिजेत असे ते म्हणाले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, पै. आप्पासाहेब कदम, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, सुस्मिता जाधव, संजय पाटील, डॉ. अशोक पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार, विठ्ठल पाटील, दिलीपराव देसाई, दादासाहेब मोरे, शैलेश पाटील, अतुल पाटील, राजकुमार कांबळे, अमरसिंह साळुंखे, संजय पाटील, ब्रम्हानंद पाटील उपस्थित होते.

