• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | मृताच्या नावाने घेतलेले कर्ज मंजूर; ८ दिवसांत चौकशी: सहायक निबंधक व जिल्हा उपनिबंधक दोघेही निलंबित..!

Admin by Admin
July 4, 2026
in क्राईम, मंत्रालय, विशेष, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे चक्क मृत व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करून बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा कथित प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची पुढील सात दिवसांत सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे कडक निर्देश गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिले.

याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत सहायक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधकांना तात्काळ निलंबित करण्याची घोषणाही त्यांनी केली. विधान परिषदेत सदस्य सदाभाऊ खोत यांनी या गंभीर प्रकरणाकडे लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले होते. या चर्चेत सदस्य बच्चू कडू यांनीही सहभाग घेतला. सभागृहात उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, हा प्रकार अत्यंत गंभीर असून यात कोणाचीही गय केली जाणार नाही. पोलिसांनी येत्या सात दिवसांच्या आत या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून मुख्य दोषींवर गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात येत आहेत. या संपूर्ण घोटाळ्यात सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, बँकेचे व्यवस्थापन आणि सोसायटीचे पदाधिकारी या सर्वांची चौकशी होईल.

नेमके प्रकरण काय?

महाबळेश्वरवाडी सोसायटीत मृत व्यक्ती जिवंत असल्याचे दाखवून त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून बेकायदेशीरपणे कर्जाची उचल करण्यात आली. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात आधीच तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांकडून कोणतीही ठोस किंवा अपेक्षित कारवाई झाली नव्हती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सोसायटीला कर्ज वितरित झाल्यानंतर त्याचा संपूर्ण हिशेब बँकेकडे येतो. लाभार्थींना प्रत्यक्षात कर्ज मिळाले की नाही याची पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची असतानाही त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.

ADVT – सांगली पोलिसांकडून अधिकृत प्रसारित
Previous Post

पलूस | आंधळीत घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखांचे दागिने लंपास

Next Post

कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्यासह नूतन संचालकांचा राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या हस्ते सत्कार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्यासह नूतन संचालकांचा राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या हस्ते सत्कार

कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्यासह नूतन संचालकांचा राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या हस्ते सत्कार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group