• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत घरफोडी; १३ तोळे सोन्यासह सहा लाखांची चोरी

Admin by Admin
July 3, 2026
in क्राईम
1 min read
0
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विजयनगर परिसरात घटना, कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांचा प्रवेश

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

विजयनगर परिसरातील अष्टविनायकनगरमध्ये बंद घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने तेरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दीड लाखांची रोकड, असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला. गुरुवारी सकाळी ही चोरी उघडकीस आली. या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दगडू पांडुरंग सरगर (वय ५१) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडू सरगर यांचे अष्टविनायकनगर गल्ली क्रमांक तीनमध्ये घर आहे. ते हमालीचा व्यवसाय करतात. बुधवारी सकाळी सात वाजता घराला कुलूप लावून ते बाहेर गेले होते. त्या वेळी चोरट्याने पाळत ठेवून त्यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटला. चोरट्याने कपाटातील दीड लाखांच्या रोकडसह २५ ग्रॅमचे मंगळसूत्र, पाच ग्रॅम वजनाच्या आठ अंगठ्या, २१ ग्रॅमचा लक्ष्मीहार, ११ ग्रॅमची चेन, दहा ग्रॅमचा नेकलेस, सात ग्रॅमची कर्णफुले, पाच ग्रॅमची बोरमाळ, पाच ग्रॅमची साखळी, पाच ग्रॅमचा सोन्याचा वेल, चार ग्रॅम वजनाची ठुशी, दोन ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, एक ग्रॅमचा बदाम आणि ३५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

सरगर हे गुरुवारी सकाळी घरी परतले, त्या वेळी त्यांना चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने संजयनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला. सराईत चोरट्याने पाळत ठेवून ही चोरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अधिक तपास सुरू आहे.

ADVT – सांगली पोलिसांकडून अधिकृत प्रसारित
Previous Post

हरिपूर येथे विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

Next Post

शेटफळेत वृद्धेवर हल्ला करून दागिने लुटले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

शेटफळेत वृद्धेवर हल्ला करून दागिने लुटले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group