• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

काळ्या बाजारात गर्भपाताच्‍या गोळ्या, उमलण्‍याआधीच खुडतात कळ्या

Admin by Admin
July 3, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बोगस डॉक्टर, दलाल, अनधिकृत विक्रेत्यांकडून राजरोस पुरवठा : ऑनलाईन गोळ्यांनाही हवा लगाम

ADVT – सांगली पोलिसांकडून अधिकृत प्रसारित

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

बेकायदेशीर गर्भलिंग चाचणीमध्ये स्त्रीभ्रूण असल्याचे सांगून गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचा काळा बाजार जिल्ह्यात फोफावला आहे. बोगस डॉक्टर, दलाल आणि नोंदणी नसलेल्या औषध विक्रेत्यांच्या संगनमताने गर्भपाताच्या गोळ्यांचा राजरोस पुरवठा करणारी साखळी गर्भवतींसाठी जीवघेणी ठरत आहे; तर ऑनलाईन साईटद्वारे मिळणाऱ्या गर्भपाताच्या गोळ्यांनाही लगाम लावण्याची गरज आहे.

गर्भपाताची औषधे केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि वैद्यकीय देखरेखीखालीच वापरायची असतात. मात्र तपासात समोर आलेल्या काही प्रकरणांत या औषधांचा अनधिकृत पुरवठा आणि त्यातून होणारे आर्थिक व्यवहार उघड झाले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने मिळणारे तीनशे रुपयांचे किट काळ्या बाजारात ३ हजारांपासून १५ हजारांपर्यंत विकले जाते.

कर्नाटक सीमेवर होतात व्यवहार

महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील आडमार्गाच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भपाताच्या गोळ्यांचा अनधिकृत साठा केला जात आहे. त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. यामध्ये काही नोंदणी नसलेल्या औषध विक्रेत्यांचाही सहभाग आहे. डॉक्टरच्या हाताखाली काम करणारे कंपाऊंडर, काही डॉक्टरांचे पीआरओ यांच्याकडून गर्भपाताच्या गोळ्यांची बेकायदेशीर खरेदी होते.

गोळ्या विक्रीची साखळी

गर्भवतीशी एजंट संपर्क साधतो

बेकायदेशीर गर्भलिंगनिदान व गर्भपाताची व्यवस्था केली जाते

अवैध पद्धतीने गोळ्यांचा पुरवठा

पाच ते सहा पट किमतीने गोळ्यांची विक्री होते

 

Previous Post

ब्रेकिंग | महसूल विभागात मोठा फेरबदल.! साताऱ्यातील २२३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली..!

Next Post

हरिपूर येथे विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

हरिपूर येथे विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group