• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वळसंगमधील जमीन व्यवहारातील मृत व्यक्ती जिवंत

Admin by Admin
July 1, 2026
in क्राईम
1 min read
0
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खोटे घोषणापत्र करून दस्त नोंद, फसवणुकीचा गुन्हा

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

वळसंग (ता. जत) येथील जमीन खरेदी दस्ताच्या घोषणापत्रामध्ये मयत व्यक्ती जिवंत असल्याचा खोटा उल्लेख करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी मीरासाहेब देवदास ढाले (रा. मिरज नदीवेस, बौद्ध कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून कुंतल तरुण बासु (वय ४५, रा. फरिदाबाद, हरियाणा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १३ मार्च २०२५ रोजी जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आरआरबी एनर्जी कंपनीच्या नावावरील वळसंग येथील जमीन गट क्रमांक ६९२ व ६९३, दस्त क्रमांक १५९६/२०२५, १५९७/२०२५ व १५९८/२०२५ द्वारे विविध व्यक्तींच्या नावे खरेदीखत नोंदविण्यात आले होते. मात्र, या जमिनीचे मूळ मालक श्रीकांत तुकाराम साळे (रा. सांगोला, जि. सोलापूर) यांनी या खरेदीखताच्या घोषणापत्राबाबत आक्षेप घेत तक्रार दाखल केली.

जमीन खरेदीच्या घोषणापत्रात वारसांपैकी कोणतीही व्यक्ती मयत नसल्याचा खोटा उल्लेख करण्यात आला होता. प्रत्यक्षात वारसांमधील एक व्यक्ती मयत असूनही ती जिवंत असल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जत पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

ब्रेकिंग | मिरज शहर पोलीसांकडून सराईत गुन्हेगारांवर ‘मकोका’ : शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ..!

Next Post

हरिपूर येथे दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

हरिपूर येथे दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group