• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मिरज शहर पोलीसांकडून सराईत गुन्हेगारांवर ‘मकोका’ : शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ..!

Admin by Admin
June 30, 2026
in क्राईम
1 min read
0
ब्रेकिंग | मिरज शहर पोलीसांकडून सराईत गुन्हेगारांवर ‘मकोका’ : शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज शहर परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या ‘पिट्या भोरे’ टोळीवर मिरज शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली, मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या पथकाने केली. या कारवाईत गजानन बिराजदार, सचिन ऐवळे आणि अनिता पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलिसांनी पृथ्वीराज उर्फ पिट्या राहुल भोरे (वय २०), ध्रुव राहुल भोरे (वय २३), प्रथमेश स्वरूप तांदळे (वय २९) आणि प्रवीण विनोद मोरे (वय २०) या चौघांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे चौघेही मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. संबंधित प्रकरणात आरोपींनी एका व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले होते.

आरोपींच्या गुन्हेगारी इतिहासाची सखोल पडताळणी केल्यानंतर त्यांची कृत्ये संघटित गुन्हेगारीच्या व्याख्येत बसत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मिरज शहर पोलिसांनी याबाबतचा प्रस्ताव सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला होता.

पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १११ अंतर्गत वाढीव कलमे लावत मकोका अंतर्गत कारवाई करण्यास परवानगी देण्यात आली. या कारवाईमुळे मिरज परिसरातील संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिरज शहरातील प्रियदर्शनी हॉटेल लगत असणारा प्रशस्त गाळा भाड्याने देणे आहे.
Previous Post

ब्रेकिंग | प्रवाशांनी खचाखच भरलेली खाजगी ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उलटली, चालकासह दोघांचा जागीच मृत्यू

Next Post

वळसंगमधील जमीन व्यवहारातील मृत व्यक्ती जिवंत

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

वळसंगमधील जमीन व्यवहारातील मृत व्यक्ती जिवंत

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group