• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग ! सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत.!

Admin by Admin
June 27, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग ! सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

राज्यातील रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून वाहन सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आणि चिंताजनक बनला आहे. सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या चारचाकी वाहनाला रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहनातील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे सुदैवाने आमदार गाडगीळ व त्यांचे सहकारी मोठ्या अनर्थातून बचावले आहेत. अपघातात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाल्याचं दिसून येतं आहे, त्यावरुन अपघाताची तीव्रता लक्षात येईल.

आमदार सुधीर गाडगीळ हे आपले स्वीय सहाय्यक, अंगरक्षक, फोटोग्राफर आणि वाहनचालक यांच्यासह चारचाकी वाहनातून उगार येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून परतत असताना, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून अंकलीच्या दिशेने जात असताना ‘वडडी आणि कृष्णा घाट’ रस्त्यादरम्यान हा अपघात झाला. कृष्णा घाट सर्व्हिस रोडजवळ अचानक एक दुचाकी वाहन आमदार गाडगीळ यांच्या कारसमोर आडवे आले. या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहनांची धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारमधील सुरक्षेसाठी असलेल्या एअरबॅग्ज तात्काळ उघडल्या. त्यामुळे आमदार गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला लागलेली किरकोळ दुखापत वगळता मोठा अनर्थ टळला. ​

कारमधील अंगरक्षक नागेश भोकरे, फोटोग्राफर विकास गुंडप आणि चालक गणपती दरेकर हे सर्वजण सुदैवाने सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या अपघातात दुचाकी चालकही जखमी झाला असून, त्याला तातडीने 108 रुग्णवाहिकेतून ‘मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ​अपघातानंतर आमदार सुधीर गाडगीळ यांना तातडीने दुसऱ्या वाहनातून खासगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे.

Previous Post

कुपवाड येथे मोहरम शांततेत व भक्तीमय वातावरणात संपन्न

Next Post

अपघातानंतर प्रथमच माध्यमांसमोर आमदार गाडगीळ यांची प्रतिक्रिया..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अपघातानंतर प्रथमच माध्यमांसमोर आमदार गाडगीळ यांची प्रतिक्रिया..!

अपघातानंतर प्रथमच माध्यमांसमोर आमदार गाडगीळ यांची प्रतिक्रिया..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group