• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अपघातानंतर प्रथमच माध्यमांसमोर आमदार गाडगीळ यांची प्रतिक्रिया..!

Admin by Admin
June 27, 2026
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
अपघातानंतर प्रथमच माध्यमांसमोर आमदार गाडगीळ यांची प्रतिक्रिया..!

अपघातानंतर सांगलीचे आ. सुधीर गाडगीळ यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली

4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर झालेल्या अपघातात धनंजय उर्फ सुधीर हरी गाडगीळ यांच्या वाहनाला अपघात झाला. मात्र, ईश्वराच्या कृपेने मोठी दुर्घटना टळली असून ते सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या अपघातात त्यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून हाताला चार टाके पडले आहेत. डॉक्टरांनी आवश्यक उपचार करून काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून कोणताही गंभीर धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अपघातावेळी त्यांच्यासोबत असलेले स्वीय सहाय्यक, अंगरक्षक, छायाचित्रकार आणि वाहनचालक हे सर्व सुखरूप आहेत. तसेच समोरच्या वाहनातील व्यक्तीदेखील सुरक्षित असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीतही लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना धनंजय (सुधीर) गाडगीळ यांनी व्यक्त केली आहे.

अपघातानंतर सांगलीचे आ. सुधीर गाडगीळ यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली

अपघाताची माहिती मिळताच अनेक आप्तेष्ट, हितचिंतक, मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारपूस करून शुभेच्छा व्यक्त केल्या. या सर्वांच्या प्रेम, सदिच्छा आणि आशीर्वादाबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.
“आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वादामुळे मी लवकरच पूर्णपणे बरा होऊन पूर्ववत जनसेवेसाठी कार्यरत होईन,” असा विश्वास धनंजय उर्फ सुधीर हरी गाडगीळ यांनी व्यक्त केला.

Previous Post

मोठी ब्रेकिंग ! सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत.!

Next Post

आमदार राजेश क्षीरसागर यांचा ‘टक्केवारीचा’ कथित व्हिडिओ प्रचंड व्हायरल, शिवसेना करणार कारवाई..? संभाषण काय झाले सविस्तर वाचा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आमदार राजेश क्षीरसागर यांचा ‘टक्केवारीचा’ कथित व्हिडिओ प्रचंड व्हायरल, शिवसेना करणार कारवाई..? संभाषण काय झाले सविस्तर वाचा..!

आमदार राजेश क्षीरसागर यांचा 'टक्केवारीचा' कथित व्हिडिओ प्रचंड व्हायरल, शिवसेना करणार कारवाई..? संभाषण काय झाले सविस्तर वाचा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group