• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत दिवसा फ्लॅट फोडला

सोने-चांदीच्या दागिन्यांसह नऊ लाखाचा मुद्देमाल लंपास

Admin by Admin
June 27, 2026
in क्राईम
1 min read
0
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली येथील बापट मळ्याजवळील मल्हार रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ८,७५,७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शीतलकुमार सुरेंद्र पाटील (वय ४५, रा. फ्लॅट नं. ३, मल्हार रेसिडेन्सी, बापट मळा) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी नोकरीत असलेले शीतलकुमार पाटील हे २४ जून रोजी सकाळी ९ वाजता आपल्या घराला कुलूप लावून नोकरीनिमित्त बाहेर गेले होते. यादरम्यान चोरट्याने त्यांच्या फ्लॅटच्या समोरील दाराचा कडीकोयंडा कशाच्या तरी साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून आतील ५० ग्रॅमचे सोन्याचे गंठण, १५ ग्रॅमचे मणीमंगळसूत्र, सोन्याच्या पाटल्या, अंगठ्या, चांदीचे विविध दागिने आणि कपाटात ठेवलेली २०,००० रुपयांची रोकड असा एकूण ८ लाख ७५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

पाटील हे सायंकाळी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती दिली असता, विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये दुपारी तीनच्या सुमारास दोन संशयित चोरटे अपार्टमेंटमध्ये शिरल्याचे दिसत आहे. चोरट्यांनी अवघ्या दहा मिनिटांत घरातील कपाट उचकटून सर्व मुद्देमाल लंपास केल्याचे फुटेजवरून उघड झाले आहे. या फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांचा माग काढत आहेत.

Previous Post

सांगली पोलिस ‘डायल ११२’मध्ये राज्यात आघाडीवर- अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती..!

Next Post

हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांचे निलंबन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांचे निलंबन

हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांचे निलंबन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group