• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली पोलिस ‘डायल ११२’मध्ये राज्यात आघाडीवर- अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती..!

कॅफेबाबत कडक नियमावलीची नोटीस

Admin by Admin
June 27, 2026
in क्राईम, विशेष
1 min read
0
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी पोलिस दल नेहमीच प्रयत्नशील असते. पोलिस मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकाचा नागरिकांना मोठा फायदा होत आहे. कॉल आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहोचत आहेत. राज्यातील ताज्या आकडेवारीनुसार, सांगली पोलिसांचा प्रतिसाद कालावधी (रिस्पॉन्स टाईम) हा अवघ्या सात मिनिटांचा आहे. दररोज सरासरी १२५ हून अधिक कॉल येत असून, त्याला तातडीने प्रतिसाद दिला जातो. या कामगिरीत सांगली जिल्हा राज्यात तिसऱ्या ते पाचव्या स्थानावर असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.

दोशी म्हणाले, आपत्कालीन सेवेसाठी ‘डायल ११२’ हा क्रमांक अत्यंत प्रभावी ठरत आहे. ही पूर्णतः ऑनलाइन यंत्रणा असून याचे थेट ट्रॅकिंग केले जाते. नागरिकांचा कॉल आल्यानंतर तो मुख्य कॉल सेंटरला जातो, तिथे १ मिनिट ३३ सेकंद लागतात. तेथून तो स्थानिक नियंत्रण कक्षाला आणि पुढे संबंधित भागातील पोलिस गाडीला जोडला जातो. कॉल मिळाल्यापासून सात मिनिटांच्या आत पोलिस गाडी घटनास्थळावर पोहोचते. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली पोलिसांची पोहोचण्याची वेळ खूपच कमी आहे. याच तत्परतेमुळे सांगली जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे.

काही दिवसांपूर्वी तो तिसऱ्या क्रमांकावर होता. हा प्रतिसाद कालावधी आणखी कमी करून जिल्हा पहिल्या क्रमांकावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कक्षासाठी कर्मचारी संख्याही वाढवण्यात आली आहे. या गतिमान यंत्रणेमुळे काही गंभीर गुन्हे रोखण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

Previous Post

ईडी छाप्‍याचे सत्य सहा महिन्यांनी बाहेर येईल

Next Post

सांगलीत दिवसा फ्लॅट फोडला

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

सांगलीत दिवसा फ्लॅट फोडला

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group