• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांचे निलंबन

विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांचा सांगलीत इशारा

Admin by Admin
June 27, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांचे निलंबन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

गंभीर गुन्ह्यांच्या तपासात आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. खून, दरोड्यासह गंभीर गुन्ह्यांमध्ये जर पोलिस अधिकारी किंवा अंमलदारांनी कर्तव्यात कसूर केल्यास किंवा कामात हलगर्जीपणा आढळल्यास, त्यांचे थेट निलंबन करण्यात येईल, असा कडक इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी येथे दिला.

पदभार स्वीकारल्यानंतर श्री. शर्मा गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. संजयनगर पोलिस ठाण्याला भेट दिल्यानंतर त्यांनी पोलिस मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्याशिवाय जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देत इशारा दिला. यावेळी सांगलीचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्‍पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक संदीप भागवत, प्रणिल गिल्डा आणि निरीक्षक संजीव झाडे उपस्थित होते.

​ ‘दिसणारे पोलिसिंग’ आणि…

​सांगलीतील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी गुंडाविरोधी पथकासह एक ठोस ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. लोकांना सुरक्षित वाटेल असे पोलिसिंग झाले पाहिजे, असे सांगत त्यांनी आता पोलिस प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून कडक कारवाई करताना दिसतील आणि येत्या काही महिन्यांत सांगलीकरांना हा बदल प्रकर्षाने जाणवेल, असा विश्वास व्यक्त केला.

बंडगर हत्याप्रकरणी ‘मोक्का’

​संजयनगरमधील बंडगर खून प्रकरणाचा उल्लेख करताना श्री. शर्मा म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत वेदनादायी आहे. या गुन्ह्याचा सखोल आढावा घेतला असून, आतापर्यंत नऊ आरोपी निष्पन्न झाले आहेत. या टोळीवर लवकरच ”मोक्का”अंतर्गत कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल आणि या प्रकरणातील एकाही दोषीला सोडले जाणार नाही.

Previous Post

सांगलीत दिवसा फ्लॅट फोडला

Next Post

ब्रेकिंग – सांगलीत खून | बायकोने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा गळा आवळून केला खून !

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
राज्यातील कुख्यात गुंडाचा भीषण अंत 

ब्रेकिंग - सांगलीत खून | बायकोने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा गळा आवळून केला खून !

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group