• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मिरज वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकारीपदी API रणजीत तिप्पे यांची नियुक्ती तर सुनील गिड्डे यांची संजयनगर पोलिस ठाण्यात बदली..!

Admin by Admin
June 22, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | मिरज वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकारीपदी API रणजीत तिप्पे यांची नियुक्ती तर सुनील गिड्डे यांची संजयनगर पोलिस ठाण्यात बदली..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज शहरातील वाहतूक नियोजन करणे खूपच कठीण काम असल्याचे सामाजिक कार्यकर्ते वारंवार बोलून दाखवतात. मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी सपोनि सुनील गिड्डे यांनी गेल्या काही वर्षात उत्कृष्ट काम करत त्याचे सुनियोजन केल्याचे दिसून आले. त्यांनी शहरातील गांधी चौकातील सिग्नल यंत्रणा सुद्धा सुरू केली. शिवाय व्हीआयपी दौरे, मिरवणुका, रॅली, यामध्ये प्रभावी कार्यपद्धती दाखवून दिली.

प्रशासकीय कारणास्तव सोमवारी रात्री उशिरा पोलिस अधीक्षकांनी काही अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वाहतूक नियंत्रण शाखा, मिरजचे सपोनि सुनील गिड्डे यांची संजयनगर पोलिस ठाण्यात तर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील सपोनि रणजीत तिप्पे यांची वाहतूक नियंत्रण शाखा मिरज येथे रात्री उशिरा पोलिस अधीक्षकांनी आदेश पारेषित करून बदली केली आहे.

मिरज शहरातील एकंदरित वाहतूक समस्येबाबत विचार केल्यास शाळा व शासकीय कार्यालयात ये जा करणाऱ्यांची वर्दळ आणि गांधी चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यंत होणारी वाहतूक कोंडी यासह छ. शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग, शहर पोलिस ठाण्याच्या दारात दैनंदिन होणारे पार्किंग याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याचे आव्हान हे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत तिप्पे यांच्यासमोर असणार आहे.

Previous Post

ब्रेकिंग | खासदार ओमराजे निंबाळकरांची मोठी घोषणा; शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार..!

Next Post

ब्रेकिंग | मिरजेच्या ‘डीवायएसपी’पदी संदेश नाईक यांची नियुक्ती, प्रणिल गिल्डा यांची शाहूवाडी येथे बदली ..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मिरजेच्या ‘डीवायएसपी’पदी संदेश नाईक यांची नियुक्ती, प्रणिल गिल्डा यांची शाहूवाडी येथे बदली ..!

ब्रेकिंग | मिरजेच्या 'डीवायएसपी'पदी संदेश नाईक यांची नियुक्ती, प्रणिल गिल्डा यांची शाहूवाडी येथे बदली ..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group