केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे दुखःद निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल रात्री १० वाजून २० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मावळली. किसनराव मोहोळ यांच्या जाण्याने पुण्यात शोककळा पसरली असून आज सकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
किसनराव दगडोबा मोहोळ हे फक्त मुरलीअण्णांचे वडीलच नाही तर नामवंत पैलवान देखीस आहे. अनेक कुस्त्यांमध्ये त्यांनी रस दाखवला अन् आवड देखील जपली होती. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत त्यांनी तब्बल ४० वर्षे सेवा निभावली होती. क्रीडा आणि सहकार क्षेत्रात त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले होते. अशातच त्यांच्या जाण्याने आता मोहोळ कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे.
किसनराव मोहोळ यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी शुक्रवार, १९ जून रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत कोथरूड येथील वेणूकृष्णा निवासस्थान येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.



















