• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीतील बहुचर्चित वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयित सागर चौगुलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिस यंत्रणा सतर्क, पाळेमुळे शोधून काढणार..!

Admin by Admin
June 16, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीतील बहुचर्चित वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयित सागर चौगुलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिस यंत्रणा सतर्क, पाळेमुळे शोधून काढणार..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली शहरातील माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर खून प्रकरणातील पसार संशयित सागर उर्फ नानासो माणिक चौगुले (रा. अग्रण धुळगाव, ता. कवठेमहांकाळ) याने आज विषारी द्रव्य प्रशान करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने कवठेमहांकाळ रुग्णालयात दाखल केले.

परंतु परिस्थिती लक्षात येताच पुढच्या उपचारार्थ त्याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यतात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे यांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, १४ वर्षीय बालक वेदांत बंडगर याचा रिव्हॉल्वरने गोळी घालून निर्घृण खून करण्यात आला. यानंतर जिल्ह्यातील सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. या खून प्रकरणात मुख्य सुत्रधार नीलेश विठोबा गडदे, किरण लोखंडे, विशाल चौगुले, सागर चौगुले आणि अतुल वायदंडे यांच्यावर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलिसांनी अतुल वायदंडे याला यापुर्वीच अटक केली होती. त्यानंतर मुख्य सुत्रधार नीलेश गडदे याला काल अटक केली. दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. यातील संशयित किरण, विशाल आणि सागर हे तिघेही पसार होते. त्यांच्या शोधासाठी एलसीबीची पथके रवाना करण्यात आली आहे.

दरम्यान, सागर चौगुले याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. कवठेमहांकाळमध्ये त्याच्यावर प्रथमिक उपचार झाले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचा पोलिस शोध घेत आहे. पसार असणाऱ्या संशयिताच्या या कृत्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Previous Post

ब्रेकिंग | कुख्यात गुंड निलेश गडदे पोलिसांना अखेर सापडला : वेळ पडली, तर गडदेच्या गोळीला गोळीने उत्तर देण्याची पोलिसांची होती तयारी.!

Next Post

‘त्या’ खून प्रकरणी पालकमंत्री संतापले..! खुनातील संशयितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यानुसार कारवाई होणार..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘त्या’ खून प्रकरणी पालकमंत्री संतापले..! खुनातील संशयितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यानुसार कारवाई होणार..!

'त्या' खून प्रकरणी पालकमंत्री संतापले..! खुनातील संशयितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यानुसार कारवाई होणार..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group