• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | कुख्यात गुंड निलेश गडदे पोलिसांना अखेर सापडला : वेळ पडली, तर गडदेच्या गोळीला गोळीने उत्तर देण्याची पोलिसांची होती तयारी.!

Admin by Admin
June 14, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | कुख्यात गुंड निलेश गडदे पोलिसांना अखेर सापडला : वेळ पडली, तर गडदेच्या गोळीला गोळीने उत्तर देण्याची पोलिसांची होती तयारी.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश गडदे कर्नाटक सीमेजवळ लॉजवर मैत्रिणीसह अटक; एलसीबीची धडक कारवाई

वेदांत बंडगर याच्या खूनातील मुख्य सुत्रधार निलेश विठोबा गडदे (मूळ रा. हमालवाडी, सध्या रा. कुंभारी, ता. जत) याच्या पोलिसांनी आज सायंकाळी मुसक्या आवळल्या. कर्नाटक सीमा भागात मैत्रिणीसोबत लॉजवर असताना तो सापडला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानेही कारवाई केली. या गुन्ह्यातील अन्य तिघांचा शोध सुरू आहे. यापुर्वी अटकेत असलेला अतुल वायदंडे हा पोलिस कोठडीत आहे.

मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे या दोन गटांत वाद होता. या कामाचा ठेका लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावे म्हणून संशयित नीलेश गडदे दबाव आणला होता. बुधवारी रात्री सातच्या सुमारास दोन साथीदारांसह गडदे खरात यांच्या घरात गेला. खरात घरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावले. खंडणीही मागितली. खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे गेले. गडदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमा झाले होते. पोलिस ठाण्याच्या परिसरात दोन गट समोरासमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. तेव्हा संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या चारचाकीवर दगडफेक केली. त्यामुळे गडदे चिडला होता. त्याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली. त्यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला नातू वेदांतवर गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंद आहे. संशयित वायदंडे याच्या शोधासाठी पाच पथके रवाना झाली होती.

मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर कर्नाटक सीमा भागातील एका लॉजवर तो असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार छापेमारी करत त्याला ताब्यात घेण्यात आले. आज रात्री उशीरा त्याला सांगलीत आणण्यात आले होते. दरम्यान, क्रूर कृत्य करून कोणताही पश्‍चाताप त्याच्याजवळ नव्हता. मैत्रिणीसोबत तो लॉजवर आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. उद्या (ता. १५) त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

‘एन्काउंटर’ची फक्त चर्चाच ! स्वतः हजर झाला असता तर पोलिसांची अब्रूच गेली असती.? 

निलेश गडदे हा कुख्यात गुंड आहे. यापुर्वी त्याने कामागार नेते दत्ता पाटोळे यांचा खून केला होता. वेदांत बंडगर याच्या डोळ्यात गोळी मारताना त्याची क्रूरता दिसून आली होती. त्यामुळे त्याच्या शोधात गेलेल्या पथकाला तो सहजासहजी हाताला लागेल, अशी खात्री नव्हती. वेळ पडली, तर गडदेच्या गोळीला गोळीने उत्तर देण्याची तयारी पोलिसांनी ठेवली होती. यामुळेच गडदेचा ‘एन्काउंटर’ होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतू गडदे विनासायास पोलिसांच्या सापळ्यात अडकला. तो स्वतः हजर झाला असता तर अक्षरशा: पोलिसांची अब्रूच गेली असती..? परंतु, आता मात्र स्थानिक गुन्हे अन्त्यावेषण विभागाने त्याला पकडला म्हणून निदान एन्काउंटर न करता त्याचा त्यातून जीव वाचला, आता पोलिसांचा कडक कायदा त्याला काय शिक्षा देतो.?  याकडे पीडित कुटुंबासह संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Previous Post

मिरजेतील टाकळी रस्ता परिसरात खुनी हल्ला, पुन्हा टोळीयुद्ध..?

Next Post

सांगलीतील बहुचर्चित वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयित सागर चौगुलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिस यंत्रणा सतर्क, पाळेमुळे शोधून काढणार..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीतील बहुचर्चित वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयित सागर चौगुलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिस यंत्रणा सतर्क, पाळेमुळे शोधून काढणार..!

सांगलीतील बहुचर्चित वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयित सागर चौगुलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिस यंत्रणा सतर्क, पाळेमुळे शोधून काढणार..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group