• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पश्चिम महाराष्ट्रात खळबळ ! आंबेडकरी चळवळीचे प्रमुख नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांचा उद्या भाजप प्रवेश..!

Admin by Admin
May 29, 2026
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
पश्चिम महाराष्ट्रात खळबळ ! आंबेडकरी चळवळीचे प्रमुख नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांचा उद्या भाजप प्रवेश..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली जिल्ह्यातील राजकारणात आता नवा संवाद पाहायला मिळणार आहे. शहरातील विविध विषय घेऊन रस्त्यावरची लढाई, आंदोलने, मोर्चे काढण्यात अग्रक्रमाने पुढाकार घेणारे, पश्चिम महाराष्ट्राचे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांचा उद्या शनिवारी मिरज शहरातील आळतेकर हॉल याठिकाणी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे.

मिरज शहरात शनिवारी भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा, पदाधिकारी निवडी पार पडणार आहेत. याचवेळी मिरज शहर व ग्रामीण भागातील राजकारणात धुमाकूळ घालणाऱ्या दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

यामध्ये विशेषतः कवठेपिरान येथील ज्येष्ठ नेते अनिल आमटवणें, डॉ. महेशकुमार कांबळे, युवा नेते दिगंबर जाधव, राष्ट्रवादीचे शाबाज कुरणे यांच्यासह ग्रामीण भागातील ग्रामपंचायत व सहकारी सोसायटीचे सदस्य – प्रमुख पदाधिकारी भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत.

या पक्षप्रवेश सोहळ्यास मिरजेचे आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, भाजप नेते व स्टार प्रचारक आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासहित भाजपचे जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

शहरात मोटारसायकल रॅली

पक्षप्रवेशाच्या अगोदर डॉ. महेशकुमार कांबळे यांच्याकडून शनिवारी सकाळी शहरात मोटारसायकल रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले असल्याचे समजते आहे.

Previous Post

मिरज परिसरात ४० लाखांची चांदी जप्त..!

Next Post

बिग ब्रेकिंग | हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद अन् शेकडो अभियंत्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बिग ब्रेकिंग | हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद अन् शेकडो अभियंत्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ.!

बिग ब्रेकिंग | हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद अन् शेकडो अभियंत्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group