• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी बिनविरोध, राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर

Admin by Admin
February 5, 2026
in राजकीय
1 min read
0
सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी बिनविरोध, राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीत बुधवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. महापौरपदासाठी भाजपचे धीरज सूर्यवंशी व उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

त्यानंतर दोघांनीही अर्ज दाखल केले. ऐनवेळी विरोधी काँग्रेसने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली. आता निवडीची अधिकृत घोषणा १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. सकाळी भाजप व राष्ट्रवादीच्या नेते, नगरसेवकांची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. भाजपच्यावतीने महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी व उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या गजानन मगदूम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोघांच्या नावाची घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली. त्यानंतर दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.

विरोधी काँग्रेसकडूनही अर्ज दाखल करण्याच्या हालचाली सुरू होत्या. खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी नगरसेवकांशी चर्चा केली. याचवेळी भाजप नेत्यांनीही काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांशी संपर्क साधला. सध्या महाराष्ट्र अजितदादांच्या निधनाने वेगळ्या स्थितीतून जात असून निवडणूक टाळण्याची विनंती केली. त्याला काँग्रेस नेत्यांनीही सहमती दर्शविली. अखेर महापौर व उपमहापौरपदासाठी सूर्यवंशी व मगदूम यांचेच दोन अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले असून अधिकृत घोषणा १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Previous Post

नगरसेविका स्वाती शिंदे थेट हजेरी केंद्रावर; आठच कर्मचारी कामावर..!

Next Post

मिरज परिसरात ४० लाखांची चांदी जप्त..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज परिसरात ४० लाखांची चांदी जप्त..!

मिरज परिसरात ४० लाखांची चांदी जप्त..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group