• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

नगरसेविका स्वाती शिंदे थेट हजेरी केंद्रावर; आठच कर्मचारी कामावर..!

Admin by Admin
February 4, 2026
in राजकीय
1 min read
0
नगरसेविका स्वाती शिंदे थेट हजेरी केंद्रावर; आठच कर्मचारी कामावर..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली शहरातील येथील प्रभाग 16 च्या नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे मंगळवारी सकाळी 6 वाजता स्वच्छता कर्मचारी हजेरी केंद्रावर पोहोचल्या. साडेसहा वाजेपर्यंत केवळ आठच कर्मचारी उपस्थित होते. नगरसेविका शिंदे यांनी परिसर स्वच्छतेमधील हलगर्जीपणावर बोट ठेवत आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे तक्रार करीत कारवाईची मागणी केली आहे.

नगरसेविका शिंदे म्हणाल्या, प्रभागात नियमित स्वच्छता होत नसल्याबाबत नागरिकांमधून तक्रारी येत होत्या. त्यामुळे सकाळी सहा वाजता स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरी ठिकाणी अचानक पाहणी केली. प्रभाग क्रमांक 16 मध्ये दोन हजेरी केंद्रे आहेत. हिराबाग कॉर्नर येथील हजेरी केंद्रावर केवळ एकच स्वच्छता कर्मचारी आले होते, तर चोपडे हॉस्पिटलच्या पिछाडीस असलेल्या हजेरी केंद्रावर सात कर्मचारी साडेसहा वाजेपर्यंत हजर होते. प्रत्यक्षात या प्रभागात 50 हून अधिक स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. पाहणीवेळी स्वच्छता निरीक्षक अनुपस्थित होते. दोनपैकी प्रवीण चव्हाण हे एकमेव मुकादम उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 16 हा शहरातील मध्यवर्ती प्रभाग असून येथे 40 हून अधिक गल्ल्या, मुख्य रस्ते, फुटपाथ, चौक, बाजारपेठा, मच्छी व मटण मार्केट, शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज, एमएसईबी कार्यालय, उद्याने अशा अनेक वर्दळीच्या ठिकाणांचा समावेश आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे नगरसेविका शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वच्छता कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची हजेरी व्यवस्थित होण्यासाठी बायोमेट्रिक फेस रीडिंग व मोबाईल ट्रॅकिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. अनुपस्थित कर्मचाऱ्यांना ‌’कारणे दाखवा‌’ नोटीस द्यावी. महापालिकेकडून दिलेल्या मास्क, हॅन्ड ग्लोव्हज्‌‍, जॅकेट, गमबूट आदी साधनांचा नियमित वापर बंधनकारक करावा. स्वच्छता कर्मचाऱ्यांची नागरिकांशी वर्तणूक सुधारण्याची गरज आहे. प्रभागाचे काही भागांमध्ये विभाजन करून प्रत्येक भागासाठी ठराविक कर्मचारी नेमावेत.

Previous Post

मिरज | हद्दपार असतानाही खुलेआम शहरात वावर, गुन्हेगाराकडून गांजाची तस्करी, यंत्रणेचे अपयश.?

Next Post

सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी बिनविरोध, राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी बिनविरोध, राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर

सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी बिनविरोध, राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group